शिरपूर आता महाराष्ट्रात कोठेही गेले तर मिळणार स्वस्त रेशन; प्रफुल्ल पाटील भारतीय जनता पक्ष तालुका उपअध्यक्ष
त-हाडी – प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील व त-हाडी , वरूळ भटाणे जवखेडा त-हाडकसबे अभानपुर जळोद विखरण भामपुर व परिसरातील नागरिकांनी आता महाराष्ट्रात कोठेही कामाला गेले तर मिळणार रेशन मोदी सरकारचा महत्त्व पूर्ण निर्णय भाजापाचे प्रफुल्ल पाटील शिरपूर तालुका उपाध्यक्ष केंद्र सरकारने गरीब व सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त धान्य सहज उपलब्ध व्हावे यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. आता नागरिकांना स्वस्त धान्य मिळवण्यात येत असलेली अडचण दूर होणार आहे. शासनाने वन नेशन वन रेशन या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
बऱ्याचदा राज्यातील स्थलांतरीत कामगार, ऊसतोड मजूर, आदीवासी व इतरांना अनेकदा स्थलांतर करावे लागते, मात्र स्थलांतर केल्यावर त्यांना इतर ठिकाणी स्वस्त धान्य योजनेचा गरीबांना लाभ मिळत नाही, त्यामुळे त्यांना नाईलाजाने चढ्या दराने बाजारातून धान्य घ्यावे लागते.मात्र आता केंद्र शासनाने वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना सुरू केलेली असून त्याची अंमलबजणी राज्यातही करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे, या निर्णयामुळे राज्यातील विविध घटकातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असून नागरिकांना इतर ठिकाणीही सहज स्वस्त धान्य उपलब्ध होणार आहे.
राष्ट्रीय जन सुरक्षा पाणनताल लाना जाता शिधा पत्रिकेवरील 12 अंकी क्रमांकाचा वापर करून देशभरात कोठेही स्वस्त धान्य घेता येणार आहे. म्हणजेच ज्या व्यक्तीकडे शिधापत्रिका आहे तो व्यक्ती देशातील कोणत्याही राज्यात गेल्यास तेथे त्याला राज्यात ज्या प्रमाणे स्वस्त धान्य मिळते त्याच प्रमाणे तेथेही स्वस्त धान्य मिळणार आहे.सदरील लाभ घेण्यासाठी शिधापत्रिकेतील कमीत कमी एक लाभार्थ्यांच्या आधार क्रमांक शिधापत्रिके सोबत संलग्न असावा. लाभार्थ्याकडे एकापेक्षा जास्त शिधापत्रिका नसाव्यात. सदरील लाभार्थ्याला ई-पॉस मशीनवर बायोमॅट्रीक आधार प्रमाणीकरण यशस्वी झाल्यानंतरच एक देश एक शिधापत्रिका योजने अंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेता येईल
या निर्णयामुळे देशभरातील रेशनकार्ड धारकांना आता कोठेही स्वस्त धान्य मिळणे सोपे होणार आहे. त्यामुळे गरीब, गरजू व सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.अशी माहिती भाजपचे प प्रफुल्ल पाटील त-हाडी यांनी बोलताना दिली.







