शिक्षक आमदार संपावर गेले❓️
भावी शिक्षकांसाठी लढत पावसात भिजत असताना मला एक प्रश्न पडलाय की महाराष्ट्रातील शिक्षक आमदार आहेत तरी कुठे?
शिक्षकांना नोकरी मिळावी म्हणून आम्ही सामान्य अभियोग्यता धारक संघर्ष समितीच्या वतीने गेली आठवडा झाले आझाद मैदान, मुंबई येथे पावसात भिजतोय, विधानभवन मध्ये शिक्षकांचा मुद्दा उचलून धरला जातोय… मग ज्यांच्या मतदानावर तुम्ही शिक्षक आमदार म्हणून निवडून आलात त्यांच्या समस्या तुम्हाला दिसत नाहीत का❓️
राज्यातील 2 लाख 16 हजार अभियोग्यता धारकांना न्याय आणि हक्काची शिक्षकांची नोकरी मिळावी म्हणून आम्ही आजवर सतत पाठपुरावा करत आहोत. परंतु सरकारच्या दिरंगाई कारभारामुळे फक्त आश्वसन मिळते आहे.
"कोणाला शिक्षक आमदार आढळल्यास त्वरित मला संपर्क करा,पावसाळी अधिवेशनात भावी शिक्षकांना न्याय मिळवून देण्यास कोणीही शिक्षक आमदार दिसत नाही आणि सामान्य अभियोग्यता धारक यांच्या व्यथा शासनाकडे जोरदारपणे मांडताना दिसून येत नाही ज्यांना आपलं म्हणून मतदान केले आणि विश्वास ठेवला कि आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी हे लोकप्रतिनिधी लढा देतील आमच्या समस्या सुटणार व शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल सुरू होणार,55000शिक्षक भरती प्रक्रिया सुरू या मागण्यावर जाब विचारला जाणार व निवृत्त शिक्षक नेमणूक याला या आमदारांकडून जोरदार विरोध केला जाईल व तात्काळ शिक्षक भरती प्रक्रियेचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करायला भाग पाडतील परंतु या शिक्षक व पदवीधर आमदार यांच्या कडून फक्त निवडणुकीत भरघोस आश्वासन दिले जाते या विषयी खूप खंत वाटते.
कारण तुम्ही आमच्या हक्कासाठी लढणार म्हणूनच आम्ही रांगेत उभं राहून मतदान केले याची किमान जाणीव ठेवा.
सामान्य अभियोग्यता धारक समिती, महाराष्ट्र राज्य
- तुषार शेटे







