सासरा कोमात,जावई जोमात अधिकाच्या महिन्यामुळे
त-हाडी प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यात व त-हाडी परिसरात यंदा सर्वसामान्य कुटुंबामध्ये जून-जुलै महिना आर्थिक चचणीचा असतो. या महिन्यात शेतकऱ्याला शेतातून उत्पन्न येण्याऐवजी खरीप हंगामातील पेरणी, कोळपणी, खत, बी-बियाणे, शाळेत मुलांचे शिक्षण यामुळे बळीराजाच आर्थिक गणित पूर्णतः बिघडलेले असते. त्यातच तीन वर्षानंतर यावर्षी अधिक मास आला आहे. मागील अधिकच्या मास कोरोना काळात आल्यामुळे सासरे पाटलांनी जेवायला धोंड दान दिले नाही.
आता सोन्याचे भाव कमी झालेले आहेत आणि कोरोना संकटही संपून गेले आहे. आता जावयासमोर कारण तरी कुठले करावे, त्यामुळे सासरेबुवासाठी हा महिना दुष्काळात तेरावा महिना घेऊन आला आहे. जावई राजा हाताच्या बोटाकड वारंवार बघत सासरवाडीच्या फोनची वाट बघत आहे. आषाढ महिना संपताच अधिक श्रावण म्हणून सुरू होणारा अधिक मास हा यावर्षी सामान्यांसाठी खर्चिकच होणार आहे, हा अधिक मास महिन्यामुळे सासरे पाटलांच आर्थिक गणित बिघडणार आहे. कालगणनेत दर तीन वर्षांनंतर येणारा अधिक मास हा चंद्र वर्षीय व सौर वर्ष यात पडलेला तीस दिवसांचा फरक भरून काढत असतो. यावर्षी १७ जुलैपासून अधिक मासास प्रारंभ होत आहे.
ग्रामीण भागात आजही अधिक मास हा धोंड्याचा महिना म्हणून ओळखला जातो. अधिक मासाचे स्वामी हे भगवान विष्णू आहेत. तर पती-पत्नीला लक्ष्मी-नारायण जोडा म्हणून ओळखले जातात. त्यामुळे धोंड्याच्या महिन्यात मुलगी व जावई यांना जेवणाचे आमंत्रण दिले जाते. त्यात त्यांना धोंडे दान केले जाते. त्यानंतर कालांतराने सोने-चांदी या मौल्यवान वस्तू जावई बापूंना देण्याची प्रथा निर्माण झाली. यंदा १८ जुलैपासून १६ ऑगस्टपर्यंत धोंड्याचा महिना असणार आहे. या महिन्यात जावईबापूंना सोन्याचा किंवा चांदीचा धोंडा दिला जातो. अधिक मासात जावयाला वाण देण्याची प्रथा आहे. याला धोंडा असेही म्हणतात. येत्या १८ जुलैपासून ज्येष्ठ मासास प्रारंभ झाला असून, जावयांसाठी हा सुगीचा महिना ठरतो. विशेषतः नवविवाहितांसाठी अधिकचा महिना म्हणजे पर्वणी म्हणावे लागेल. त्यात सुवर्णपेढ्या आणि मिठाई व्यापारी आघाडीवर आहेत. सुवर्णपेढ्यांनी जावयांना खूश करण्यासाठी आकर्षक चांदीचे दिवे, तबक आणले आहेत. सोने आणि चांदीचे दर या महिन्याभरात कमी झाल्याने सासरेबुवांकडून धोंड्याच्या महिन्यात सोन्या चांदीचे काहीतरी धोंडदान मिळणार यासाठी जावयांच्या आशा अपेक्षा पल्लवीत झाल्या आहेत.
▪️””यंदा हा पुरुषोत्तम मास आहे.दान धर्म करणे हे पवित्र असल्याने,धोंड्याघ्या महिन्यात तर जावई बापूंना आवर्जून धोंडे दान करायला पाहिजेत.
राजेंद्र कुलकर्णी (महाराज)
त-हाडी ता शिरपूर







