अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जळोद येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी, लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
त-हाडी –
शिरपूर तालुक्यातील जळोद अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतनिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक . सुजित पाडवी यांनी अध्यक्ष म्हणून स्थान भूषविले. या कार्यक्रमात इ.१ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. रवींद्र भावसार यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहिती दिली प्राथमिक पदवीधर शिक्षिका नांद्रे मॅडम यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष . सुजित पाडवी यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षक बोरसे यांनी केले. आभार प्रदर्शन सी एम राजपूत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.







