• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, April 19, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

भटक्या विमुक्त या वंचित समाजाचे प्रश्न सोडविणार…. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माणगंगा by माणगंगा
August 9, 2023
in मुंबई
0
भटक्या विमुक्त या वंचित समाजाचे प्रश्न सोडविणार…. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भटक्या विमुक्त या वंचित समाजाचे प्रश्न सोडविणार

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

म्हसवड:
राज्यातील भटक्या विमुक्त या वंचित समाजाच्या वर्षानुवर्षे प्रलंबित मुलभुत प्रश्ना तातडीने सोडविण्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
भटके विमुक्त समाजाच्या विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुबई विधान भवन कक्षात निमंत्रित केलेल्या शासकिय बैठकीत वरील आस्वासन दिले.


भटके मुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धनंजय ओंबासे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली श्री एकनाथ शिंदे यांना भेटलेल्या शिष्टमंडळाच्या उपस्थित झालेल्या या बैठकीस मागास बहुजन कल्याण मंत्रालयाचे मंत्री अतुलजी सावे ,वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार,सचिव प्रा. सखाराम धुमाळ, राज्य युवा आघाडी अध्यक्ष प्रतीक गोसावी,याबरोबरच इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव,सामाजिक न्याय विभागाचे सचिव, सांस्कृतिक विभागाचे सचिव विधी व न्याय विभागाचे सचिव तसेच संबंधित इतर संबंधीत विभागांचे संचालक उपस्थित होते.


या बैठकीत केंद्रातील सामाजिक न्याय विभागाच्या ता.18 ऑगष्ट 2020 च्या आदेशानुसार समस्त भटक्या विमुक्तांचे सर्वेक्षण करणे,
यशवंतराव चव्हाण पालमुक्त वसाहत योजना ग्रामीण व शहरी दोन्ही विभागास लागू करणे,जातीच्या प्रमाणपत्रा संबंधित सन 2008 च्या अध्यादेश मध्ये बदल करून पुनर्जीवित करणे, सन १९६१ पुरावा न मागता ग्रामसेवक यांनी गृह भेट देऊन समंधित कागद पत्रे व पुराव्याचे आधारे जात प्रमाणपत्र देणे,


महा ज्योती संस्थेअंतर्गत परदेशी स्कॉलरशिप मध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाचा समावेश करणे, लोककलावंतांच्या मानधनात वाढ करणे व लोक कलावंत महामंडळाची स्थापना करणे,
वसंतराव नाईक विकास महामंडळ 500 कोटीचे अनुदान देणे,अंबरनाथ ( जि. ठाणे )येथील सर्कस मैदानात भटक्या विमुक्त समाजाच्या वसाहतीचे पुनर्वसन करणे,
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना लागू केलेल्या नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश देण्याचे योजनेमध्ये भटके विमुक्तांच्या इतर अ,ब,ड प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश करणे, गोसावी समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देणे
इत्यादी प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी या शिष्टमंडळाने सुमारे दोन तास चर्चा केली.


या चर्चेनंतर भटक्या विमुक्त समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी व न्याय देण्यासाठी योग्य ते निर्णय घेऊ असे आश्वासन श्री.शिंदे यांनी या बैठकीमधील सर्व पदाधिकाऱ्यांना दिले. याबरोबरच सन 2008 च्या जी आर संधर्भात शुद्धी पत्रक काढून जात प्रमाणपत्र देण्याची पद्धत त्वरित सोपी करण्याचे आदेश सचिव श्री भांगे यांना त्याक्षणीच दिले.


या बैठकीत भटक्या विमुक्त वंचित व दुर्लक्षित समाजाच्या
मूलभूत प्रश्ना संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी संवेदनशील पणे उपस्थित मंत्री,सचिव व शिष्टमंडळातील सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करुन तातडीने सर्व समस्यांचे निवारण करण्याचे आस्वासनासह शासन पातळीवर आदेश दिले व
पुढील काळातही भटक्या विमुक्त या वंचित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिल्यामुळे या बैठकीस उपस्थित असलेल्या भटक्या विमुक्त संघटनेच्या पदाधिका-यांनी समाधान व्यक्त केले तसेच चर्चेत ऐनवेळी उपस्थित केलेल्या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशा संदर्भात नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट ची मागणी करण्यात येणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले तसेच ठेलारी समाजाच्या आरक्षित वनपट्ट्या संदर्भात देखील योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल असेही आश्वासित केले. तसेच केंद्राच्या नॉन क्रिमिलियर आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री यांनी सर्व सचिवांना दिले.


बैठकीमध्ये आपले मत मांडताना हक्क प्रा. धनंजय ओंबासे यांनी आपले मांडताना “भटके विमुक्त समाजतील बी प्रवर्ग हा खऱ्या अर्थाने वंचित प्रवर्ग आहे त्यामुळे त्यांच्यावर योजना राबवताना कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये याची प्रकर्षाने सर्व अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याची विनंती केली. तसेच महाज्योती मध्ये योजना राबवताना याबरोबरच ओबीसी व व्ही जे एन टी यांना निधी देताना आरक्षणाच्या रेशिवो प्रमाणे विभाजन करून न्याय देण्यात यावा अशी मागणी केली.


या बैठकीस महाराष्ट्राच्या सर्व विभागातून भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्रचे विविध पदाधिकारी समवेत राज्य सचिव प्रा.सखाराम धुमाळ, उपाध्यक्ष कृष्णा जाधव सर, मराठवाडा विभाग अध्यक्ष माणिकराव रेनके,युवा आघाडी अध्यक्ष प्रतीक गोसावी, विदर्भ विभाग अध्यक्ष महेश गिरी, कला व सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष लहू ढवळे, महिला आघाडी अध्यक्ष श्रीमती कोमल वर्दे, उत्तर महाराष्ट्र विभाग संघटक अशोक गिरी, पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडी अध्यक्ष नागेश जाधव,डॉ. प्रसाद ओंबासे, श्री राजेश बोड्रे, श्री शिवदास वाघमोडे, श्री भिमराव इंगोले,श्री विलास गरदरे यांनी उपस्थित राहुन विवीध मूलभूत प्रश्नांच्या अंमलबजावणी साठी आपली मते मांडली.

छायाचित्र
मुंबई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित विधानभवन कक्ष मध्ये भटके विमुक्त समाजाच्या विविध समस्या बाबत झालेल्या बैठकीस श्री धनंजय ओंबासे समवेत संघटनेचे पदाधिकारी

Views: 140
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
त-हाडी येथे कानुबाई रोट महोत्सवाची जय्यत तयारी

त-हाडी येथे कानुबाई रोट महोत्सवाची जय्यत तयारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)