• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, April 19, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

त-हाडी येथे कानुबाई रोट महोत्सवाची जय्यत तयारी

माणगंगा by माणगंगा
August 10, 2023
in महाराष्ट्र
0
त-हाडी येथे कानुबाई रोट महोत्सवाची जय्यत तयारी

त-हाडी येथे कानुबाई रोट महोत्सवाची जय्यत तयारी

महेंद्र खोंडे
त-हाडी: त-हाडी येथील श्रीराम मंदिरात नुकतीच बैठक पार पडली बैठकीतून रविवार ( २० ऑगस्ट ) रोजी कानुबाईचे आगमन होणार असल्याचे सरपंच प्रतिनिधी सुनिल धनगर यांनी सांगितले खान्देशातील त-हाडी येथे ग्रामदैवत कानुबाई मातेचा सण उत्साहात आणि मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे


तसेच आमना कानबाईना उत्सव म्हणजे खान्देशनी दिवाई. दिवाळी या सणाच्या आगमनापूर्वी जशी घराची रंगरंगोटी केली जाते,संपुर्ण घराची साफसफाई देखील केली जाते, तशीच तयारी कानबाईच्या रोटपूर्वी देखील केली जाते. या उत्सवासाठी कुठली तारीख किंवा तिथी ठरवलेली नसते. नागपंचमी नंतर येणारा पहिला रविवार हा कानबाईच्या रोटचा दिवस असतो. शनिवार, रविवार आणि सोमवार असे तीन दिवस हा सण साजरा करण्यात येतो तसेच श्रावणातील नागपंचमीनंतरच्या पहिल्या शनिवारी व रविवारी कानबाईमाता किंवा कानुबाईचा रोट हा उत्सव पश्चिम परिसरासह त-हाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे. यंदा हा उत्सव २० व २१ ऑगस्टला त-हाडी गावात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

गावात कानबाईमाता उत्सवाला खूप जुनी परंपरा लाभली आहे. त्यासाठी मुहूर्त पाहत नाही. नागपंचमीनंतरच्या येणाऱ्या शनिवारी व रविवारी रोट होतात. त-हाडी येथे पुरातन काळातले कानबाई मातेचे मंदिर आहे. ज्यांना नवीनच कानबाई बसवायची असेल तर ते नारळ घेऊन येथील मूर्तीला स्पर्श करून आणतात. तर असे हे परतून आणलेले नारळ त्या दिवशी धुवून घेतात त्यालाच नथ, डोळे बसवून इतरही पारंपरिक दागिने घालतात. केळीचे व कण्हेरीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेवून तिची स्थापना केली जाते. कळसावरच गळ्यातील हार, मणी मंगळसूत्र चढवले जाते.

वरून शेवंतीची वेणी लावून ओढणी लावली जाते. मग आरती, नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला अर्थातच पुरणपोळ्या, पुरणाचेच दिवे, देवीचा सगळा साज कणकेचाच केला जातो. आमटी, भाजी, काशाच्या ताटात ठेवून देवीला ओवाळतात. इतर सणासारखाच येथेही ज्येष्ठांना मान असतो. रात्री गावात जागरण केले जाते. फुगड्या, गाणी म्हटली जातात. अलीकडे भजन, कीर्तनही केले जाते. काही जणांकडे फक्त रोट असतात. मग ते रोट परातीत घेऊन कानबाईच्या दर्शनाला येतात. या दिवशी कुणी कानबाईला काही नवस केला असेल तर तो फेडण्यासाठीही त-हाडी गावी मोठी गर्दी होते. दुसऱ्या दिवशी सकाळी कानबाईच्या विसर्जनाची तयारी होईल गावातील माध्यमिक विद्यालय त-हाडी येथे गावाच्या सर्वच कानुबाई एकंदरीत जमुन तेथून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक निघते.

व रोटसाठी कुटुंबातील येतात एकत्र त-हाडी गावात गेली अनेक दशके ही परंपरा सुरू आहे. रोटसाठी घरातील व कुटुंबातील सर्व जण एकत्र येतात. नोकरदार किंवा बाहेरगावी कामानिमित्त गेलेलेही आपुल्या गावी परत येत असतात याबाबत कानुबाईच्या रोटची पोस्ट सोशल मिडिया वर शेअर केली जात असल्याचे दिसून येत आहे काही भाविकांनी स्टेटस ठेवून कानुबाई च्या रोट महोत्सवासाठी आमंत्रित केले आहे


या सणामुळे कुटुंबातील वाद, कुरबूर आणि अबोला मिटल्याचे जाणकार लोकांनी सांगितले .शनिवारी कानबाईचा रोट खऱ्या अर्थाने सुरू होतो. पहिल्या दिवशी ३ पिढ्यांचे कुटुंब एकत्र येते, सोबत गहू दळले जातात.
दुसऱ्या दिवशी सगळी भाऊबंदकी एकत्र येते. मंडळी, राजकारणामुळे तुटलेल्या भाऊबंदक्या कानबाईच्या रोटमुळे वर्षानुवर्षाचे भांडण मिटून पुन्हा एकत्र आल्याची अनेक उदाहरणे त-हाडी गावात सापडतील. या दिवशी सगळी भाऊबंदकी एकत्र येऊन एकाच ताटात जेवतात.

यामुळे मतभेद संपुष्टात येऊन पुन्हा एकत्र येऊन दुरावा नष्ट होतो. याच दिवशी रात्री जागरण असते. कानबाईचा दिवा रात्रभर डोळ्यात तेल घालून पेटता ठेवावा लागतो. यादिवशी गावाच्या बाहेर गेल्यामुळे जे सोबत मोठे झाले नाहीत अशा तिसऱ्या पिढीची मुले एकमेकांची ओळख करून घेतात.

भाऊबंदकीतल्या सुनांची मैत्री होते.व त-हाडी येथे सोमवार रोजी कानबाईचे विधिवत तापी नदी च्या काठावर विसर्जन केले जाणार आहे.व पुढील वर्षी हर्षोउल्हासत आगमन होण्याची प्रार्थना केली जाते त-हाडी करांनी रोट महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त-हाडी ग्रामस्थांनी केले आहे

Views: 185
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
माझी माती, माझा देश अभियानातंर्गत

माझी माती, माझा देश अभियानातंर्गत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)