जळोद आश्रम शाळेत विद्यार्थिनींने केले ध्वजारोहण
त-हाडी
अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा ,जळोद ता.शिरपूर येथे ‘आजादी का अमृत महोत्सवानिमित्त’ “हर घर तिरंगा घरघर तिरंगा “या उपक्रमांतर्गत आज दिनांvक 13.08.2022 रोजी आश्रमशाळा जळोद येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आमच्या माध्यमिक शाळेतील सर्वानुमते निवड झालेली इयत्ता 10 वी ची विद्यार्थिनी काजल गोविंद पावरा हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण मानवंदना कमांड भावना मंगलसिंग पावरा हिने सांभाळली नंतर राष्ट्रीय गीत , ध्वजगीत व राज्य गीत घेण्यात आले आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालेले पाहून शाळेतील विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला. या उपक्रमासाठी प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापक सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर, कर्मचारी उपस्थित होते.







