आता जगण्याच्या काठीला मिळाले आणखी ५०० रुपयांचे बळ
निराधार योजनांचे मानधन वाढले, लाभार्थ्यांमध्ये समाधान
महेंद्र खोंडे
त-हाडी-
संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेंतर्गत दिले जाणारे अर्थसाहाय्य ५०० रुपयांनी वाढविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना संबंधित घोषणा करीत निधीची तरतूद केली. या घोषणेमुळे आता निराधारांना आर्थिक आधार मिळणार आहे.
महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मिळणार पैसे निराधार योजनांचे अनुदान नियमित मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. कधी दरमहा लाभार्थीच्या बँक खात्यात अनुदान जमा होते, तर कधी दोन-तीन महिनेही लागतात. विलंबामुळे या अनुदानावर अवलंबून असणाच्या निराधारांची गैरसोय होते. आता सरकारने प्रत्येक महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अनुदान जमा करण्याची हमी दिली आहे. यामुळे निराधारांना वेळेत व वाढीव मदत मिळणार आहे.
तालुक्यात एकूण २६४८५ लाभार्थी आहेत. ५०० रुपये हा आकडा लहान वाटत असला, तरी लाभार्थीची संख्या विचारात घेतली तर त्यांना द्यावे लागणारे वाढीव अनुदान हे कोट्यवधीत आहे. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर दरमहा सुमारे कोटी रुपयांचा अतिरिक्त भार वाढणार आहे.
निराधारांचे अर्थसहाय्य ५०० रुपयांनी वाढले
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेअंतर्गत लाभार्थीना सद्यःस्थितीत दरमहा एक हजार रुपये अनुदान मिळते. आता सरकारच्या घोषणेनंतर यात ५०० रुपयांची वाढ होऊन दरमहा दीड हजार रुपये मानधन मिळणार आहे..
तालुक्यातील अशी आहे लाभार्थी संख्या…
संजय गांधी निराधार अनूदान योजना सर्वसाधारण -=४७०५
संजय गांधी निराधार अनूदान योजना अनुसुचीत जाती- =३६३
संजय गांधी निराधार अनूदान योजना अनुसुचीत जमाती-=१३८१
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना सर्वसाधारण-=५३९०
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अनुसूचित जाती -=२८८
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अनुसूचित जमाती-=७८०
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना-=१०३१८
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना-=३१८९
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना-=५५
एकूण = लाभार्थी =२६४८५
राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजना-१२६

