राख्यांनी सजली बाजारपेठ; किंमतीत ५ टक्के वाढ, खरेदीला मात्र अल्प प्रतिसाद
त-हाडी- प्रतिनिधी : रक्षाबंधनाचा सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. यानिमित्त बाजारपेठेत विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध झाल्या आहे. या राख्या बाजारपेठेत लक्ष वेधून घेत आहेत. मात्र, अजूनही म्हणावा तसा खरेदीसाठी प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून येत आहेत.
भावाच्या व बहिणीच्या नात्याचे बंध बांधणारा राखीपौर्णिमा सण ३० ऑगस्टला आहे. हे नाते अधिक घट्ट करणासाठी राख्यांचे विशेष महत्त्व असते. होलसेल राखी बाजारपेठेत विविध प्रकारच्या राखी विक्रीसाठी आणल्या आहेत. फॅन्सी, डायमंड राखी, वुलन आदी राख्या बाजारामध्ये विक्रीसाठी आल्या आहेत.मागील वर्षापेक्षा यंदा राख्यांच्या दरात पाच टक्के वाढ झालेली असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहेत.
वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या उपलब्ध
लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या राखी आवडी निवडीप्रमाणे बहिणीकडून खरेदी केल्या जातात. त्यासाठी बाजारपेठेत विविध प्रकारचे राख्या विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.
रुद्राक्ष, मोती, मनी, स्टोन, ओम, स्वस्तिक, पेंडल, ब्रासलेट पद्धतीची राखी या १० रुपयांपासून ते १४० ते १६० रुपये डझन अशा विविध प्रकारच्या राख्या विक्रेत्यांकडे आहे.
छोटा भीम, लिटील क्रिष्णा राखीला मागणी
लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या कार्टूनच्या राख्या विविध प्रकारात बाजारात आल्या आहे. यात छोटा भीम, लिटील क्रिष्णा, टेडी बेअर, लाईट व म्युझिकची राखी, विविध रंगामध्ये कार्टूनचे चित्रे असलेल्या राख्या १० रुपयांपासून ते १४० रुपयांपर्यंत आहे.
मागील वर्षी बाजारात राख्या घेण्यासाठी महिलांची गर्दी होती. मात्र यंदा अजून ही बाजारात राख्या खरेदीला महिलांची प्रतिसाद कमी दिसत आहे.
ऑनलाईन राख्या खरेदीकडे महिलांचा कल
अनेक ऑनलाईन वस्तू विक्रीच्या साईटवर राख्यादेखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे ऑनलाईन राख्या खरेदीला देखील महिलांचा कल वाढलेला असल्याने बाजारपेठेत याचा परिणाम दिसत आहे







