कापुस शेतकरी शेतीशाळा माध्यमाने कापुस उत्पादवाढीसाठी मार्गदर्शन
त-हाडी प्रतिनिधी
- भटाणे – ममाने येथील शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे मान्य तालुका कृषी अधिकारी शिरपूर सी डी साठे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस पिकाची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना अंतर्गत मौजे तऱ्हाडी,भटाणे, ममाने, शिवारात कापूस पिक प्रात्यक्षिक १०० हेक्टर क्षेत्रावर राबविण्यात येत आहे अंतर्गत कापूस पीक शेतकऱ्यांची शेतीशाळाचे माध्यमाने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी व कापूस उत्पादन वाढ करण्याच्या दृष्टीने
शेतकऱ्यांना विविध उपाय योजना सुचविण्यात आले त्यात श्री मधुकर फकिरा पाटील यांच्या कापुस क्षेत्रात वर जाऊन कापूस पीक परिसंस्थेच्या अभ्यास पिकाचे निरीक्षणे घेऊन प्रत्यक्ष कृतीतून पिकावरील नुकसानकारक शत्रू कीड ओळख आणि मित्र किडींची ओळख करणे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन ,कामगंध सापळे , निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, रस शोषणारे किडी मावा, तुडतुडे, फुलकिडे ,पांढरी माशी यांचे नियंत्रण बाबत मार्गदर्शन ,गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन, मका पिकावरील लष्करीअळीचे व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन कृषी सहाय्यक अतुल बाविस्कर यांनी केले, एकात्मिक तण व्यवस्थापन, मृद आरोग्य पत्रिका आधारित किंवा जमीन सुपीकता निर्देशांक पीक शिफारस नुसार एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थपन व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार फवारणीद्वारे खते देणे ,ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खतांचा वापर करणे. असे उपाय योजना कृषी सहाय्यक महेंद्र पाटील यांनी सुचविण्यात आले - , पंतप्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवण्यासाठी सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाविषयी माहिती देऊन शेतकरी गटांना व वैयक्तिक लाभासाठी शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसायबाबत , महा डी बी टी पोर्टल विविध अनुदानाचे योजना बाबत अडचणी , पि एम किसान , कृषि विस्तार योजना बाबत. मंडळ कृषी अधिकारी, आर्थे रविंद्र वसावे यांनी माहिती दिली व प्रास्ताविक महेंद्र पाटील यांनी विवीध योजनेविषयी माहिती दिली. सहकार्य श्री. मधुकर फकिरा पाटील पाटील यांनी त्यांचा कापुस प्लॉट चे व्यवस्थापन बाबत माहिती दिली व किरण धनराज भामरे,बिपीन उखा पाटील कृषि मित्र,शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित गावातील प्रगतशील शेतकरी श्री मधुकर पाटील यांनी पिक व्यवस्थापन पिकं पद्धती बाबत शेती करत असताना येणारे अडचणी बाबत चर्चा व पदाधिकाऱ्यांचे श्री महेंद्र पाटील यानी आभार मानले







