क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात पर्यावरण पूरक गणेशाची उत्साहात स्थापना.
त-हाडी –
शहादा तालुक्यातील कोंढावळ येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात आराध्य दैवत व बुद्धी देवता गणेशची पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करण्यात आली.सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यालय मुख्याध्यापक जे,पी माळी यांच्या हस्ते विधिवत गजाननाची पूजा करून स्थापना करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना कल्पना शक्तीला वांव मिळावं म्हणून इयत्ता ५ते १० वीच्या विद्यार्थानी पर्यावरण पूरक शाडू मातीचे प्रत्येक वर्गातील एक एक गणपती स्वतः च्या हाताने तयार करून विद्यार्थ्यांनी शाळेत आणले मुख्याध्यापक जे पी माळी यांनी परीक्षणं केली
ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत सर्व विद्यार्थ्यांच्या व शिक्षक वृदांच्या सहभागात. उपशिक्षक पी.टी.परदेशीं,सांस्कृतिक समिती अध्यक्ष जी.डी.वाल्हे, डी.एस.जगताप,आर.एच.खैरनार,वाय.एस.शिंपी,के.एस्.सैंदाणे, एम.एम.माळी तसेच शिक्षेकेत्तर कर्मचारी आर.डी.माळी,आर.एम.बागुल,एस.डी.बैसाणे सर्व शिक्षक शिक्षिका यांनी सहकार्य केले शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी,व विद्यार्थी उपस्थित होते.
शाळेतील हा गणेशउत्सव पाच दिवसाचा असणार आहे.
या पाच दिवसीय गणेशोत्सवात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा व त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी म्हणून विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात वकृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा,देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा,शालेय क्रीडा स्पर्धा अशा कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.तसेच काही व्याख्यात्यांच्या व्याख्यानांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.शाळेत हा उत्सव पहिल्यांदाच साजरा होत असल्याकारणाने विद्यार्थी यातअत्यंत उत्साहाने सहभागी झाले.







