अनुदानित आश्रमशाळा जळोद येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी*
त-हाडी
अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जळोद येथे आज दिनांक 02/10/2023 रोजी ” महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री यांची जयंती” साजरी करण्यात आली.
महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे पदाधिकारी रवींद्र शेलार व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुजित पाडवी सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
वकृत्व स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. शेवटी अध्यक्ष भाषण माध्यमिक मुख्याध्यापक सुजित पाडवी सरांनी केले सुजित पाडवी सरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे राष्ट्रपती लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक रवींद्र भावसार सरांनी केले तर प्रस्ताविक माध्यमिक शिक्षक पंडित बोरसे सरांनी केले. आभार प्रदर्शन प्राथमिक शिक्षिका जयमाला पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या वेळी सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .







