ग्रामस्वच्छता अभियानात त-हाडी ग्रा.पं.ला वसंतराव नाईक तृतीय क्रमांक पुरस्कार प्रदान
वरूळ : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत येथील ग्रामपंचायतीला वसंतराव नाईक पुरस्कार (सांडपाणी) तृतीय क्रमांकाचा जिल्हास्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता पुरस्कार प्रदान करण्यात आला
महाराष्ट्रातील ५६ जिल्हा परिषद गटातील ५४१ ग्रामपंचायतींनी ग्रामस्वच्छता अभियानाच्या या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यासाठी तात्कालिक जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी संबंधित तालुक्यातील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद गट तपासणी समिती स्थापन केली होती.
या समितीच्या तपासणी अहवालानंतर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना ग्रामस्वच्छता अभियानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यात त-हाडी ग्रामपंचायतीने वसंतराव नाईक तृतीय क्रमांकाचा पंचवीस हजार रुपयाचे पुरस्कार पटकावला आहे. पुरस्कार , स्वीकारताना सरपंच जयश्री धनगर, , सुनिल धनगर, ग्रा.पं. , सदस्य व ग्रामविकास अधिकारी देवीदास धांडे व अविनाश बैसाणे युवराज भलकार, उपस्थित होते







