अजिंठा-अनाड रोडवरील देशी दारु दुकानाला अनाड गावकरी, महिला व शालेय विद्यार्थ्यांचा कडाडून विरोध.. सदरील दुकान तात्काळ न हटविल्यास तब्बल 80 विद्यार्थी टाकणार शिक्षणावर बहिष्कार
अजिंठा-अनाड रोडवरील देशी दारु दुकान तात्काळ इतरस्त्र ठिकाणी हलवावे यांसाठी अनाड गावाने आक्रमक पावित्रा घेतला असून हा एकमेवच रस्ता अनाड गावकऱ्यांना अजिंठा बाजारपेठेत जाण्यासाठी व शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी असल्याने याचा गांभीर्यपूर्वक विचार करावा यांसाठी अनाड येथील शिष्टमंडळाने काल ता.18 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक मा.झगडे साहेब, छत्रपती संभाजीनगर पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक, सिल्लोड उपविभागीय अधिकारी, सिल्लोड तहसीलदार, अजिंठा पोलीस ठाणे आदी सर्वांची भेट घेऊन निवेदने दिली. या निवेदनावर अनाड गावांतील तब्बल 80 विद्यार्थ्यांच्या व महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. याप्रसंगी अनाड गांवचे माजी सरपंच आत्माराम मुके, माजी पोलीस पाटील भास्करसिंग पवार, मार्गदर्शक अजबसिंग जाधव, माजी ग्रा.पं.सदस्य बाबासाहेब गोंडे, विद्यमान उपसरपंच प्रवीण जाधव, ग्रा.पं.सदस्य भागवत शिंदे, ग्रा.पं.सदस्य गजानन गदाई, ग्रा.पं.सदस्य तथा पत्रकार संदीप मानकर, ग्रा.पं. सदस्य निलेश पवार, गजानन खंडाळकर आदींची उपस्थिती होती..!







