भटाणे शिवारात वन्यप्राणीच्या हल्ल्यात शेळ्या व कोंबड्य केले फस्त
भटाणे सह परीसरात भितीचे वातावरण. बंदोबस्त करण्याची मागणी
त-हाडी :शिरपूर तालुक्यातील भटाणे येथील भटाणे शिवारातील राधा ॲग्री फोड इंडस्ट्रीज मध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणारे भाऊसाहेब भोजु पाटोळे यांच्या असलेल्या ९ शेळ्या व ५ कोंबड्या वन्यप्राणी शिरून ठिकठिकाणी लचके तोडून फडश्या पाडला ही घटना शुक्रवारी ( दि २०) पहाटे सुमारास घडली याबाबत माहिती अशी की भटाणे येथील राहणारे भाऊसाहेब भोजु पाटोळे यांनी दिली भटाणे शिवारातील शेखर हिम्मत पाटील यांच्या शेतात गट नंबर ४५ मध्ये शेळ्या व कोंबड्या व रात्रीला राधा ॲग्री फोड इंडस्ट्रीज मध्ये बांधलेले होते .
भाऊसाहेब भोजु पाटोळे हे पहाटे घरी अंघोळीव चहा पिण्यासाठी गेले असता शेळ्या व कोंबड्या बांधलेले जागी जाऊन पाहणी केली असता कंपाउंड मध्ये वन्य प्राणी केव्हा शिरला हे त्यांच्या लक्षात आले नाही .
सकाळी सहा वाजेच्या सुमारास गेल्यावर शेळ्या व कोंबड्या मेलेल्या अवस्थेत
दिसले.आजूबाजूला पाहिले असता त्यांना हा प्रकार पाहावयास मिळाला कापसाच्या शेतातुन आत प्रवेश करून बांधलेल्या शेळ्या व कोंबड्या वर हल्ला करून शेळ्याचे ठिकठिकाणी लचके तोडून मृत्यूमुखी पडल्याचे निदर्शनास आले.
भाऊसाहेब भोजु पाटोळे यांनी सदरील घडलेल्या घटनेची माहिती वनविभागाचे अधिकारी वनपाल दिपक जमदाडे.वनरक्षक बालाजी इंगळे वनक्षेत्रपाल मेंढें,वनविभागाचे अधिकारी व येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ सागर डुक्कर, डॉ वैभव कुंवर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा करण्यात आला भाऊसाहेब भोजु पाटोळे यांचे जवळपास ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहेत . सदरील शेळ्या व कोंबड्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई वन्यप्राणी हल्ला या नियमानुसार पशुपालक यांना देण्याची मागणी सरपंच ,उपसरपंच व ग्रामस्थांनी केली आहे.







