दिवाळीपुर्वी पीक विमा व दुष्काळ अनुदान वाटप करावे – सामाजिक कार्यकर्ते विशाल करंके
त-हाडी- प्रतिनिधी
शिरपुर तालुक्यात व त-हाडी -वरुळ परिसरात यंदा याविषयी सविस्तर माहिती अशी की, सध्या राज्यात शेतकऱ्यांच्या
मका बाजरी काढणीला वेग आला आहे. मात्र, यंदा काढणीचे दर वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. गतवर्षी पेक्षा यावर्षी मका बाजरी काढणीचे दर खूपच वाढले आहेत. मजुरांकडून मका बाजरी काढणीसाठी चार ते साडेचार हजार रुपये प्रति बॅग मागणी होत आहे.राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची मका बाजरी काढण्याची लगबग सध्या सुरू आहे. जमिनीत थोडाफार ओलावा असल्याने शेतकरी ज्वारी पिकांची पेरणी करण्याच्या तयारीत आहेत .
यावर्षी पावसाने दडी मारल्याने अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला आहे.त्याच.कमी पावसावर कसेबसे पिके अल्प प्रमाणात आली असून शेतकऱ्यांनी पेरणीसाठी केलेला खर्चही शेतकऱ्यांना परत मीळत नाही.त्यात थोड्या फार प्रमाणात उत्पादन आले असून त्या शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी कोंडीत सापडलेला आहे.अशातच शेतकऱ्यांना पीक विमा व दुष्काळी मदतीची गरज असतांना ती मिळत नाही त्यामुळेही शेतकरी अडचणीत सापडला आहे.आता परतीच्या पावसाची आशा मावळल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत . राज्यात बऱ्याच जिल्ह्यात यावर्षी एकही मोठा पाऊस न झाल्याने पाझर तलाव,विहीर,नाले कोरडे ठाक आहेत .विहीरीची पाणी पातळीही खालावली आहे.
आता कपाशीच्या पिकांना पाण्याची गरज आहे परंतु वहिरीमध्ये ही पाणी नसल्यामुळे कपाशीचे पीकं सुकून जात आहे. मका हे नगदी पीक आहे. मकाच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांचे बरेच व्यवहार अवलंबून असतात .या मकाची अशी अवस्था झाल्याने शेतकर्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे एकूणच राज्यात यावर्षी पावसाचे प्रमाण खुप कमी झाल्याने मका कपाशी आदी पिकाला खुप मोठा फटका बसला आहे. पिकाला पाणी न मिळाल्याने मुग उडीद तूरच्या शेंगा भरल्या नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
यावर्षी पावासाचे प्रमाण कमी असल्याने रब्बी पिकांची पेरणी धोक्यात आल्याने शेतकरी चिंतेत आहेत जनावरांनाही कसे सांभाळावे असा प्रश्न यक्षप्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे. चाऱ्याचा प्रश्न, व पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. यामुळे शासनाने तात्काळ दिवाळी पुर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा व दुष्काळी अनुदान वाटप करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विशाल करंके त-हाडी ता शिरपुर यांनी केली आहे.







