• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

कोकण टीडीएफच्या सचिवपदी सागर पाटील…..राज्य अध्यक्ष माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांची घोषणा

माणगंगा by माणगंगा
December 11, 2023
in महाराष्ट्र
0
कोकण टीडीएफच्या सचिवपदी सागर पाटील…..राज्य अध्यक्ष माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांची घोषणा

कोकण टीडीएफच्या सचिवपदी सागर पाटील

  • राज्य अध्यक्ष माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांची घोषणा

महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) च्या कोकण विभागीय सचिव पदी रत्नागिरी जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या रत्नागिरी येथे झालेल्या सभेमध्ये संघटनेचे राज्य अध्यक्ष माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी या निवडीबाबत अधिकृत घोषणा केली. यावेळी राज्य संघटनेचे सचिव हिरालाल पगडाल, नाशिक जिल्हा टीडीएफ संघटनेचे अध्यक्ष मोरे सर, सिंधुदुर्ग जिल्हा टीडीएफ चे अध्यक्ष अजय शिंदे , रत्नागिरी जिल्हा टीडीएफचे कार्याध्यक्ष संभाजी देवकते, सचिव रोहित जाधव, कायदेशीर सल्लागार आत्माराम मिस्त्री यांच्यासह रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीची कोकण विभागीय बैठक नुकतीच रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी मध्ये संपन्न झाली. राज्य कार्यवाह हिरालाल पगडाल यांनी विषय पत्रिकेवरील विषयानुसार सभेची सुरुवात केली.यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात तसेच कोकण विभागांमध्ये टीडीएफची बांधणी अधिक मजबूत करण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.

सध्या कोकण विभागीय टीडीएफच्या अध्यक्षपदी नरसू पाटील कार्यरत असून सचिव पदी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांची निवड करण्यात यावी अशी मागणी संपूर्ण सभागृहाने एकमताने केली. सिंधुदुर्ग टीडीएफ चे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे , महिला प्रमुख ईशा पेडणेकर यांनी सभागृहाच्या सूचनेला अनुमोदन दिले. गिरीश पाटील, सुशांत कविस्कर यासह अनेक उपस्थित सभासदांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रत्नागिरी टीडीएफ चे उपाध्यक्ष संतोष हजारे, सुनील मेटकरी, अर्चिता कोकाटे यासह सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका अध्यक्ष सचिव व पतपेढीचे संचालक उपस्थित होते.


राज्य अध्यक्ष माजी आमदार बोरस्ते यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतामध्ये पदवीधर निवडणुकी संदर्भात राज्य संघटनेची भूमिका सविस्तरपणे मांडली. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना 14 डिसेंबर पासूनच्या बेमुदत संपामध्ये सर्व क्षमतेने उतरण्याचे आवाहन केले. कोकण विभागीय टीडीएफच्या सचिव पदी रत्नागिरी जिल्हा टीडीएफ चे अध्यक्ष सागर पाटील यांची अधिकृतपणे निवड केली जात असल्याचे त्यांनी जाहीर केले. सागर पाटील यांच्या निवडीबद्दल उपस्थित सभासदांनी त्यांचे अभिनंदन केले. सभेचे सुत्रसंचलन रत्नागिरी टीडीएफ चे सचिव रोहित जाधव यांनी केले.

Views: 149
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आ.गोपीचंद पडळकर हल्ला प्रकरणी मायणी ओबीसी समाज बांधवांचा निषेध मोर्चा.

आ.गोपीचंद पडळकर हल्ला प्रकरणी मायणी ओबीसी समाज बांधवांचा निषेध मोर्चा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)