त-हाडी येथे प्रभु श्री रामचंद्र प्रतिमेची पालखी भव्य मिरवणूक ,,,,,,,,
त-हाडी
शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथे प्रभु श्रीराम रामचंद्र प्रतिमेची पालखी मिरवणूक
काढण्यात आली यावेळी व सकाळी दुधाच्या अभिषेक करण्यात आले गावकऱ्यांनी सजवलेल्या रथातून पालखीत व प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्रतिमेची प्रतीमा ठेवून मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावातील नागरिकांना अक्षता वाटप करण्यात आल्या या कार्यक्रमात गावातील नागरिक महिला बाल गोपाल तरुण वर्ग भजनी मंडळ गावकरी यांनी सहभाग घेतला यावेळी गावकऱ्यांना अक्षता वाटप करण्यात आले यावेळी सपूर्ण गावात भगवी पताका लावून वातावरण भक्तिमय झाले होते
गावातील महिला मंडळ यांनी प्रत्येक अंगणात सडा रांगोळी काढून आपला परिसर सुशोभित करण्यात आला होता संपूर्ण गाव भगवामय ध्वज बांधुन तरुनानी वातावरण निर्माण केले होते यावेळी गावात घरोघरी घरी भगवा ध्वज लावण्यात आले यावेळी संपुर्ण गावातील गावकरी तरुण बाल मंडळींनी गावातील मारुती महादेव मंदिराची साफसफाई करण्यात येऊन मंदिर परिसर स्वच्छ पाण्याने धुण्यात आली व भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते
संपूर्ण गावातून ढोल ताशे भजनी मंडळ व डि जे लावून साह्याने गावात रथातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावातील पुरुषवर्ग तरुण वर्ग बाल मंडळी महिला यांनी स्वयंपूर्ण भाग घेऊन युवकांनी तर गळ्यात भगवा रुमाल व डोक्यात भगवी टोपी घालून मिरवणूकीत भाग घेतला व मिरवणूक शांततेत पार पडली यावेळी गावातील चिमुकल्या डोक्यात कळस घेऊन कलश यात्रा काढली यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री राम मंदिर ट्रस्ट त-हाडी भजनी मंडळ गावकरी तरुण मंडळी महिला वर्ग गावातील राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले
फोटो –