मराठा आंदोलनाचे अग्रणी कार्यकर्ते योगेश केदार यांचे भावनीक आवाहन/समाज बांधवांसाठी मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: गुलाल उधळू नका. थोडं थांबा. कितीही जीव तोडून सांगितले तरी काहींना कळले नाही. समाजाला मात्र नक्की कळत होते. 25 ला अन 26 तारखेला देखील अनेक वेळा बोललो. पण तेंव्हा मलाच एकेरी भाषेत बोलले गेले. खुट्ट्या उपटल्या गेल्या नव्हत्या तर पाचर बसत होती. कायद्याचे अज्ञान असले की असे होते. हे आम्ही समजावत होतो. मीडिया मधून देखील बोलत होतो. पण डीजे च्या गोंगाटात ऐकतो कोण? नंतर काही दिवसांनी लोकांना कळाले की अरे तो योगेश केदार बोलत होता त्यात तथ्य आहे. मग पुन्हा उपोषण सुरू झाले. कायदेशीर प्रक्रियांचा अभ्यास असणाऱ्यांचे ऐकले गेलेच पाहिजे. उगाच भावनिक होऊन शक्तीपात करून घेण्याने काहीच साध्य होणार नाही. उलट शक्ती वाया जाते.
असो… जे झाले ते झाले. आता मार्ग काढावा लागेल.
शेवटी सरकार कडूनच आपला प्रश्न सुटेल. कुणावर इतकेही टोकाचे बोलने योग्य होणार नाही. सरकार मधले सगळेच शत्रू करून ठेवल्यास राहिलेले प्रश्न कसे सुटतील? कुठं पर्यंत विषय तानायचे? भाषा कोणती वापरायची? यालाही मर्यादा असतात.
आपला लढा हा संविधानाच्या मार्गाने लढणे अपेक्षित आहे. आपल्याला कायदेशीर प्रक्रिया समजून घेऊन मगच दिशा ठरवावी लागते. त्यातून हाती काय पडणार? याचा अडाखा आधीच बांधून मागणी रेटून पुढे नेली पाहिजे.
आज घडीला जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपल्या बाजूने होते. स्वतः पाटील देखील दररोज विश्वास दाखवत होते. त्यांना देखील शिवराल भाषा काढली गेली. आता तर त्यांनीही कड क भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे.
मला वाटते. जेवढे शक्ती प्रदर्शन करायचे तेवढे नक्कीच झाले आहे. आता समोर उभा राहून काम करून घेणे आवश्यक आहे. पाटलांनी स्वतः मंत्रालयात जाऊन समाजाचे प्रश्न मार्गी लावले पाहिजेत. अन् ते मंत्रालयात गेले म्हणजे कुणी त्यांच्यावर शंका घेण्याचे देखील कारण नाही. शेवटी लोकशाही मार्गाने आंदोलने करणे अन् कुठेतरी थांबून मागणी मार्गी लावणे आवश्यक आहे.