नेकनूरच्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू नेकनूर
( प्रतिनिधी ) विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली . या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे . बीड तालुक्यातील नेकनूर येथील सय्यद सलमान सय्यद रज्जाक ( वय 22 ) हा दुपारी बीड रोडवरील एका विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता मात्र त्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली .







