शिरपूर तालुक्यातीलम भीम जयंतीनिमित्त भीमसैनिकांनी आपल्या घरावर निळा झेंडा आणि विद्युत रोषणाई करा प्रफुल्ल पाटील यांचे आव्हान…….
त-हाडी – प्रतिनिधी
शिरपूर भारतीय संविधानाची निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती अख्ख्या विश्वात साजरी केली जाते त्या अनुषंगाने यंदाची भीम जयंती धूम धडाका साजरी करण्यासाठी प्रत्येक भीमसैनिकांनी आपल्या घरावर निळ्या झेंडा आणि विद्युत रोषणाई करावी असे आव्हान त-हाडी ग्रामपंचायत माजी सदस्य प्रफुल्ल पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपल्यासाठी सर्वात मोठा उत्सव आहे
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपल्यासाठी सर्व काही असून भारतीय संविधान लिहून माणसाला माणसांचे अधिकार मिळवून देणारे महामानव आहेत असा युगंधर या पृथ्वीवर पुन्हा जन्मास येणार नाही म्हणून शिरपूर शहरातील व तालुक्यातील सर्व भीमसैनिकाला दिनांक १३ एप्रिल पासून आपल्या घरावर महिनाभर निळा झेंडा आणि विद्युत रोषणाई करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती अतिशय आनंदाने साजरी करावी
व शिरपूर शहर व तालुक्यात एक आदर्श निर्माण करा गावागावात एक आदर्श भीम जयंती महोत्सव साजरा करून आपल्या प्रिय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे असे आव्हान त-हाडी ग्रामपंचायत माजी सदस्य प्रफुल्ल पाटील यांनी केले







