क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी
कोढावळ – प्रतिनधी
कोंढावळ, शहादा तालुक्यातील संत सावता माळी बहुउद्देशीय विकास मंडळ संचलित, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात ‘आषाढी एकादशी’ निमित्त हरिपाठ व वारकरी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव रमेश चैत्राम माळी होते अध्यक्ष यांनी. विठ्ठल रुख्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण केले कार्यक्रमला सुरवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी हरिपाठ करून अभंगगात चालीवर ठेका धरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष मंदाकिनी माळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे धनराज जगताप, रोहिदास खैरनार, प्रमोद परदेशी, योगेश शिंपी, गोरख वाल्हे, कैलास सैंदाणे, सुलोचना सोनवणे, मंदाकिनी माळी तसेच शिक्षेकेत्तर कर्मचारी रविंद्र माळी, रविंद्र बागुल, सोप्निल बैसाणे यांनी प्रयत्न केले.







