• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

त-हाडी येथे पालक मेळावा उत्साहात संपन्न

माणगंगा by माणगंगा
August 17, 2024
in Uncategorized
0

त-हाडी येथे पालक मेळावा उत्साहात संपन्न

ग्रामविकास संस्था संचलित कला महाविद्यालय बामखेडे त.त.व ग्रामपंचायत त-हाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१६ ऑगस्ट २०२४ शुक्रवार रोजी पालक मेळावा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.


श्रीराम मंदिर त-हाडी येथे नवीन शैक्षणिक धोरण 20-20 व कौशल्य विकास या विषयावर पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते, तंटामुक्त गावं अध्यक्ष मा.श्री तुळशीराम भाईदास पाटील होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सी. एस. करंके यांनी केले. महाविद्यालयामध्ये कोणकोणत्या योजना राबवल्या जातात यांचा पालकांना , विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना परिचय करून दिला.तसेच आपल्या उज्वल भविष्यासाठी आमच्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा असे आवाहन केले.

या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते बरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव देणारी शिक्षण पद्धती आहे. शिवाय आपल्या मातृभाषेत आपल्याला आपल्या आवडीनुसार विषय व ज्ञान शाखांची निवड करता येईल. कला शाखेचा विद्यार्थी विज्ञान व वाणिज्य शाखांचाही अभ्यास करू शकतो व आपल्या कलागुणांना चालना देऊ शकतो अशा प्रकारची ही शिक्षण पद्धती आहे . विद्यार्थी स्वयंभू विकास साध्य करेल व स्वतःच्या विकासाबरोबरच राष्ट्र विकासात त्यांचा अनमोल सहभाग असेल. त्याच बरोबर ग्रामविकास संस्थेच्या कला महाविद्यालयाला आता विज्ञान शाखेची शासन मान्यता मिळालेली आहे.

म्हणून येत्या वर्षात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही 100% रोजगार विविध नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून नोकरी व व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. तसेच
पी एम उषा या केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत ५ कोटी रुपये निधी मंजुरी मिळणारे नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय आहे. म्हणून येत्या काळात विद्यार्थ्यांना खूप मोठी संधी महाविद्यालय उपलब्ध करून देणार आहे. असा आशावाद व्यक्त केला. यावेळी प्राचार्यांनी शेतकरी पालकांना व महिलांना मार्गदर्शन केले. त्याबरोबरच परिसरातील मुलांनी बामखेडा महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आव्हान केले.


याप्रसंगी गावातील विद्यार्थी . पालक , प्रतिष्ठित नागरिक,ज्येष्ठ नागरिक व मराठी ग्रामीण पत्रकार संघाचे प्रतिनिधी इत्यादीचे सहकार्य लाभले . तसेच सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आजी माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बी. एन. गिरासे यांनी केले तर आभार प्रा . रविंद्र पावरा यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. डॉ. डी. बी. वाघ व शिक्षकेतर कर्मचारी श्री भास्कर मोरे उपस्थित होते.

Views: 132
Share

Related Posts

आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
Uncategorized

आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष

April 18, 2026
आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
Uncategorized

आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे

April 18, 2026
विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
Uncategorized

विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..

April 17, 2026
प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
Uncategorized

प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

April 16, 2026
आयुष्यातले सांगाती … दत्ताभाऊ मेघे;
Uncategorized

माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

April 16, 2026
श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
Uncategorized

श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

April 16, 2026
Next Post
तऱ्हाडी विद्यालयात बालमजुरी प्रतिबंधक जनजागृती कार्यक्रम

तऱ्हाडी विद्यालयात बालमजुरी प्रतिबंधक जनजागृती कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)