बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर रांजणगाव शालेय समिती स्थापन
वाघडू ता चाळीसगाव ग्रामपंचायत रांजणगावच्या वतीने बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनीची सुरक्षा या विषयी जिल्हा परिषद मराठी शाळा ,कन्या शाळा ,उर्दू शाळेचे मुख्याध्यापक तसेच माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक यांचेसोबत बैठक घेऊन शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनीची सुरक्षा तसेच यासाठी समिती गठित करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
सरपंच प्रमोद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली रांजणगावच्या चारही शाळांचे प्रमुख मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जी. के. सानप,जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक अनिल शिदे कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता पाटील उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शेख उस्मान कला शिक्षक सुनील जाधव यांचे उपस्थिती मध्ये विद्यार्थिनीच्या सुरक्षेविषयी चर्चा करण्यात आली.
या सर्व मुख्याध्यापकांनी तात्काळ आप आपल्या शाळेत समिती स्थापन करणे, शाळेत नवीन येणाऱ्या व्यक्तीवर लक्ष देणे,विद्यार्थिनीची विशेष काळजी घेणे तसेच मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्या अडी अडचणी सोडविणे यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात CCTV कॅमेरे लावण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्याध्यापकांनी आग्रही मागणी केली.
तसेच माध्यमिक विद्यालयात या आधीच CCTV कॅमेरे शाळेने बसविले असल्याचे सानप यांनी सांगितले.
या CCTV कॅमेऱ्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सरपंच प्रमोद चव्हाण यांनी तात्काळ पॅनल प्रमुख तथा माजी सरपंच जिभाऊ पाटील, ग्रामविकास अधिकारी दिलीप नागरे तसेच सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्या सोबत चर्चा करून जिल्हा परिषदेच्या मराठी ,कन्या ,उर्दू शाळेच्या आवारात CCTV कॅमेरे बसविण्यात येतील असे जाहीर केले.व मुलीचे सुरक्षेविषयी ग्रामपंचायती कडून सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील राहुल गायकवाड ग्रामपंचायत क्लार्क गणेश देवरे कर्मचारी वाल्मीक सोनवणे,कचरू गायकवाड प्रवीण जाधव उपस्थित होते.







