• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

गोमेवाडीतील मागासवर्गीय कुटुंबाची 5 एकर 33 गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न

माणगंगा by माणगंगा
August 24, 2024
in Uncategorized
0

गोमेवाडीतील मागासवर्गीय कुटुंबाची 5 एकर 33 गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न


बोगस फेरफार मंजूर करून बेकायदेशीर 155 दुरुस्ती


आटपाडी प्रतिनिधी


गोमेवाडी ता.आटपाडी येथील गट नंबर 198 मधील 2 हेक्टर 33 आर जमीन लाटण्यासाठी तहसील कार्यालय येथील तलाठी वाघमोडे व मंडळ अधिकारी मुलाणी यांनी बोगस फेरफार मंजूर करण्यासाठी कलम 155 नुसार कोणत्याही प्रकारची सुनावणी न घेता, वारसदार यांना न कळवता बेकायदेशीरपणे स्वतः आणेवारी मध्ये नाव दुरुस्ती करण्यासाठी तहसीलदार यांच्याकडे प्रकरण सादर करून मंजूर करून घेतले आहे.


या संबंधित मयत नामदेव लक्ष्मण जावीर यांची मुलगी वारसदार यांनी जिल्हाधिकारी सांगली व प्रांताधिकारी विटा यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.


मयत नामदेव लक्ष्मण जावीर यांनी 2001 साली गोमेवाडी हद्दीतील 4 हेक्टर 66 आर पैकी 2 हेक्टर 33 आर जमीन बाळेवाडी येथील भुते यांना विकली होती. परंतु त्याच वेळेस नामदेव लक्ष्मण जावीर यांच्या वयस्कर व अज्ञान पणाचा फायदा घेऊन त्यांच्या पत्नी हौसाबाई नामदेव जावीर यांचे बेकायदेशीर सातबारा आणेवारी मध्ये गोमेवाडी तलाठी यांचे कडून नाव लावून घेतले होते व त्या आधारे बोगस दस्त करण्यात आला होता.
त्यावेळी नामदेव लक्ष्मण जावीर यांच्याकडून घेतलेल्या 2 हेक्टर 33 आर क्षेत्राचा दस्त फेरफार मंजूर झाला. परंतु हौसाबाई लक्ष्मण जावीर यांच्याकडून घेतलेल्या दोन हेक्टर 33 आर क्षेत्राचा दस्त फेरफार ना मंजूर झाला. या संबंधित भूते यांनी जिल्हाधिकारी सांगली तसेच प्रांताधिकारी विटा यांच्याकडे अपील प्रकरण दाखल केले होते परंतु सदर प्रकरण बेकायदेशीर असून ते फेटाळण्यात आले होते….
सन 2003 मध्ये उपस्थित प्रांत अधिकारी विटा यांनी गट नंबर 198 मधील बोगस आणेवारी मधील हौसाबाई लक्ष्मण जावीर यांचे नाव कमी करून उरलेल्या 3 हेक्टर 33 आर क्षेत्रामध्ये जमिनीचे मूळ मालक नामदेव लक्ष्मण जावीर यांचे नाव लावण्यात आले होते. जानेवारी 2024 पर्यंत हे नाव सातबारा वर दिसत होते.
परंतु 22 वर्षानंतर भुते यांनी बोगस फेरफार मंजूर करण्यासाठी तलाठी व सर्कल व तहसीलदार यांना हाताशी धरून कोणत्याही प्रकारची सुनावणी न लावता वारसदार यांना नोटीसद्वारे न कळवता बेकायदेशीर 155 दुरुस्ती केलेली आहे.जमिनीचे मूळ मालक नामदेव लक्ष्मण जावीर यांचे नाव उडवून त्यांची पत्नी हौसाबाई नामदेव जावीर यांचे नाव लावण्यात आले आहे .व त्या आधारे 2 हेक्टर 33 आर म्हणजेच 5 एकर 33 गुंठे जमीन स्वतःच्या नावावर लावून घेतलेली आहे.
तरी सातबारा आणेवारी मधील नामदेव लक्ष्मण जावीर यांचे नाव कमी झाल्याचे दिसून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. हा झालेला प्रकार तहसीलदार यांनी दुरुस्त करून दिला नाही तर संबंधित अधिकारी यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आझाद मैदान येथे उपोषणाला बसणार आहे. अशी माहिती बहुजन समाज पार्टीचे खानापूर आटपाडी विधानसभा अध्यक्ष संतोष हेगडे यांनी माहिती दिली आहे.
एका मागासवर्गीय कुटुंबाची 5 एकर 33 गुंठे जमीन हडपली लोकांची जमीन हडपण्यासाठी प्रशासन सुपारी घेत आहे का ? असा सवाल बोलताना सामाजिक कार्यकर्ते संतोष हेगडे यांनी केला.

Views: 125
Share

Related Posts

आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
Uncategorized

आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष

April 18, 2026
आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
Uncategorized

आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे

April 18, 2026
विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
Uncategorized

विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..

April 17, 2026
प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
Uncategorized

प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

April 16, 2026
आयुष्यातले सांगाती … दत्ताभाऊ मेघे;
Uncategorized

माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

April 16, 2026
श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
Uncategorized

श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

April 16, 2026
Next Post
ध्वजसंहितेचे पालन न करणाऱ्या शिक्षण संस्थेवर कारवाही करावी .. सुरेश अर्जुन

ध्वजसंहितेचे पालन न करणाऱ्या शिक्षण संस्थेवर कारवाही करावी .. सुरेश अर्जुन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)