ध्वजसंहितेचे पालन न करणाऱ्या शिक्षण संस्थेवर कारवाही करावी .. सुरेश अर्जुन
आटपाडी प्रतिनिधी
झरे ता. आटपाडी येथील जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयावर ध्वज संहितेचे पालन केले नसल्याबाबत कारवाई करावी अशी मागणी शिवसेना नेते व ग्रामपंचायत सदस्य सुरेश अर्जुन यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हंटले आहे की स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा दिनांक १३ ते १४ ऑगस्ट या कालावधीमध्ये ध्वजारोहन करून ध्वज सहिंतेचे पालन करणे गरजेचे होते .परंतु झरे ता.आटपाडी येथील जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे ध्वजारोहन न करता ध्वजसहिंतेचे उल्लंघन केले आहे.
या संधर्भात अनेक पुरावे उपलब्ध आहेत. ध्वजारोह न केलेला फोटो आणि त्या दिवशीचे शाळा परिसरातील ध्वजारोहन न केलेले सीसीटीव्ही फुटेज याची तपासणी करून सबधित मुख्याध्यापकांवर कडक कारवाई करून निलंबित करण्यात यावे .अशी मागणी निवेदनात केली आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हा अधिकारी सांगली. पोलिस अधीक्षक सांगली. शिक्षण अधिकारी (माध्य) जि. प. सांगली. तहसीलदार आटपाडी, पोलिस निरीक्षक आटपाडी. यांना निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत.
तर सांगली जिल्हा परिषद, सांगली प्राथमिक शिक्षण विभाग मध्यवर्ती यांनी तालुका शिक्षण विभागांना व शिक्षण संस्थांना कळविण्यात आले होते की दि १३ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या कालावधीत जिल्हयातील शाळेत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमाची सन २०२४ मध्ये दि. १३ ऑगस्ट ते दि १५ ऑगस्ट या कालावधीत शाळेत व परिसरात हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत विविध उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार सांगली जिल्हयातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांची वेळ ही दि.१३ऑगस्ट, २०२४ व दि.१४ ऑगस्ट, २०२४ या या दोन दिवशी ध्वजसंहितेचे पालन करुन शाळेमध्ये ध्वजारोहन व ध्वजावतरण याबाबतची जबाबदारी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य यांनी समन्वयाने पार पाडावी. तसेच दि. १५ ऑगस्ट, २०२४ रोजी प्रतीवर्षी प्रमाणे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येतो, त्याप्रमाणे ध्वजारोहण करण्यात यावे. असे जिल्हा शिक्षण विभागाने लेखी कळवले होते.
परंतु जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा दिनांक १३ ते १४ ऑगस्ट या कालावधीमध्ये ध्वजारोहन केले नाही तर शासनाच्या आदेशाचे उल्लघन केले आहे . अशा शिक्षण संस्थेची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शिवसेना नेते व ग्रामपंचायत सदस्य सुरेश अर्जुन यांनी निवेदनाद्वारे केली आहे
प्रतिक्रिया
वरील सर्व प्रकाराचे दिनांक 13 व 14 ऑगस्ट चे सीसीटीव्ही फुटेज तपासावे. त्यानंतर वरील शिक्षण संस्थेने हर घर तिरंगा हा कार्यक्रम राबवलाच नाही हे स्पष्ट होईल व भांडाफोड होईल… सुरेश अर्जुन







