संजय गांधी व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांची दिवाळी गोड; विशाल करंके याची माहिती
त-हाडी -प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यात व त-हाडी परिसरात संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांची दिवाळी दि.२२/२३ पासून गोड होणार असल्याचे माहिती त-हाडी पिकं संरक्षण सहकारी सोसायटी संस्था माजी व्हा चेअरमन विशाल करंके यांनी बोलताना सांगितले आहे शिरपूर तालुक्यातील विविध निराधार योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना निधीचे वाटप बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.
त्यामुळे निराधार लाभार्थीची दिवाळी गोड होणार असल्याची माहिती संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार महेश साळुंखे यांनी दिली.शिरपुर तहसील कार्यालयाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी वृध्दपकाळ योजना यासारख्या विविध योजनांच्या पात्र लाभार्थ्यांसाठी निधी प्राप्त झाला होता. सदरील निधी विनाविलंब तात्काळ लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत बँकाना निर्देश देण्यात आले आहेत.
बँकानी अनुदान वाटपात दिरंगाई करू नये व दिवाळीपूर्वी सर्व अनुदान लाभार्थींच्या खात्यात जमा करावेत, असे निर्देश बँकाना देण्यात आले असल्याचे माहिती शिरपूर तहसीलदार महेंद्र माळी यांनी बोलताना सांगितले आहे.दि.२१/१०/२४ रोजी माजी व्हा चेअरमन विशाल करंके यांनी बँकामधे जाऊन संपर्क साधून तात्काळ निधी वाटप करुन द्यावे आणि निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांची दिवाळी गोड करावी असे सांगितले आहे.तहशील कार्यालयाकडून माहिती घेतली असता संजय गांधी निराधार योजनचे आगष्टचे १५०० रुपये व श्रावण बाळ योजनेचे जुलै आगष्टचे असे ३००० रुपये लाभार्थ्यांना उद्या व परवा वाटप करण्यात येईल.पुन्हा येत्या आठ ते दहा १५०० रुपये लाभार्थ्यांना मिळणार आहे असे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले असल्याचे माहिती माजी व्हा चेअरमन विशाल करंके यांनी बोलताना सांगितले आहे.याबाबत कोणतीही अडचण आल्यास थेट संपर्क साधावा, असे आवाहन विशाल करंके यांनी केले आहे.


