• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

सावधान ! सोशल मिडीया तुमच्या खात्याची होत आहे निगराणी; डॉ प्रा दिलवरसिंग गिरासे यांची माहिती

माणगंगा by माणगंगा
October 26, 2024
in Uncategorized
0
सावधान ! सोशल मिडीया तुमच्या खात्याची होत आहे निगराणी; डॉ प्रा दिलवरसिंग गिरासे यांची माहिती

सावधान ! सोशल मिडीया तुमच्या खात्याची होत आहे निगराणी; डॉ प्रा दिलवरसिंग गिरासे यांची माहिती

त-हाडी- प्रतिनिधी

शिरपूर : विधानसभा निवडणूक व लोकसभा निवडणुकीच्या काळात माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीमध्ये सदस्य असणाऱ्या सायबर विभागाच्यामार्फत जिल्ह्यातील सोशल मीडियाचे सनियंत्रण जिल्ह्यामध्ये सुरू झाले आहे. त्यामुळे समान माध्यमांवर राजकीय पोस्ट टाकताना सर्वांनी सावध असावे, आचारसंहितेचा भंग झाल्यास तात्काळ गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याचे डॉ प्रा दिलवरसिंग गिरासे यांनी बोलताना सांगितले आहे.


धुळे जिल्ह्यामध्ये आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक,व पोलीस दलातील अन्य सदस्यांची यासंदर्भात बैठक झाली असून सायबर सेलला निर्देश देण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात एमसीएमसी ( माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती) मध्ये सायबर सेलची एक संपूर्ण टीम यासाठी कार्यरत झाली आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये या सेलमार्फत काही गुन्हे दाखल झाले होते.

धुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या फेसबुक, द्विटर, इंस्टाग्राम, व्हाट्सअप अकाउंटवर जातीवाचक, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या, राजकीय वैमनस्य वाढवणाऱ्या पोस्ट काही समाजकंटक,असामाजिक तत्व टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणूक काळामध्ये सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी काही घटक अशावेळी कार्यान्वित होतात. अशांना लक्षात घेऊन सर्वांच्या सोशल माध्यमांची तपासणी सुरू झाली आहे. विशेषतः यापूर्वी अशा पद्धतीच्या विचित्र पोस्ट टाकणाऱ्या काही असामाजिक तत्त्वासंदर्भात सायबर सेल आणखी सतर्क झाले आहे. त्यामुळे अशा कोणत्याही पोस्ट आपल्या अकाउंट वरून फॉरवर्ड होणार नाही.

प्रसारित होणार नाही. याची काळजी नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन डॉ प्रा दिलवरसिंग गिरासे त-हाडी यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.कधीतरी कुठेतरी झालेली घटना पुन्हा पुन्हा दाखवणे, धार्मिक स्थळांच्या तोडफोडीचे जुने व्हिडिओ दाखवणे, चुकीचे व्हिडिओ व्हायरल करणे, समाज, धर्म धोक्यात असल्याच्या खोट्या आकडेवारीला सादर करणे, चुकीचे तपशील दाखवणे, असभ्य व्हिडिओ व्हायरल करणे, चित्रफितीशी छेडछाड करणे, चुकीचे अर्थ निकेल अशा पद्धतीचे एडिटिंग करणे, अशा प्रकारच्या कुरापती केल्या जाऊ शकतात. नागरिकांनी अशा पद्धतीचे व्हिडिओ कुठे टाकले गेले असेल तर जवळच्या शिरपूर पोलीस स्टेशनला लक्षात आणून देण्याचे आवाहन डॉ प्रा दिलवरसिंग गिरासे यांनी केले आहे. धुळे जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागली असून
कुटुंबप्रमुखांनी, वडीलधाऱ्यांनी आपल्या घरातील सर्व मोबाईल
धारकांना या संदर्भात अवगत करावे. तसेच व्हाट्सअप ग्रुपच्या सर्व अॅडमिनने यासंदर्भात आपल्या ग्रुपमध्ये सूचना टाकावी. पुढील ४० दिवस सामाजिक स्वास्थ बिघडवेल अशा पद्धतीचे कोणतेही पोस्ट पडणार नाही, याची काळजी एडमिनने घ्यावी, अशीही डॉ प्रा दिलवरसिंग गिरासे यांनी सांगितले आहे.

समाज माध्यमे सर्वाच्या हाती असून याचा दुरुपयोग होता कामा नये. एखादी तथ्यहीन बातमी वाऱ्यासारखी पसरविण्याचे सामथ्र्य समाज माध्यमात आहे. त्यामुळे व्हॉटसअप व तत्सम प्रसार माध्यमांचा वापर करतानाहआदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची दक्षता प्रत्येकांने घेणे आवश्यक आहे. ग्रुप अॅडमिनने याबाबत विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन मराठी ग्रामीण पत्रकार संघ सचिव डॉ प्रा दिलवरसिंग गिरासे यांनी केले आहे.

Views: 109
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
दिवाळी सणानिमित्त पणत्या, कपडे, आकाशकंदील, फराळाची सजली दुकाने

दिवाळी सणानिमित्त पणत्या, कपडे, आकाशकंदील, फराळाची सजली दुकाने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)