• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

दिवाळी सणानिमित्त पणत्या, कपडे, आकाशकंदील, फराळाची सजली दुकाने

माणगंगा by माणगंगा
October 26, 2024
in Uncategorized
0
दिवाळी सणानिमित्त पणत्या, कपडे, आकाशकंदील, फराळाची सजली दुकाने

दिवाळी सणानिमित्त पणत्या, कपडे, आकाशकंदील, फराळाची सजली दुकाने


त-हाडी ,ता.२४ (प्रतिनिधी) दिवाळी सण अवघ्या पाच - सहा दिवसावर येऊन ठेपला असून या सणाच्या पार्श्वभूमीवर त-हाडी (ता.शिरपुर)सह परिसरातील सर्व बाजारपेठा पूर्णतः सजल्या आहेत. येथील बाजारपेठेवर अंशतः दुष्काळाचे सावट असल्याने सर्वांनाच ग्राहकांच्या प्रतिक्षा लागून आहे. अद्यापही कपड़े व अन्य वस्तु खरेदीसाठी नागरिकांची गर्दी नसून केवळ आकाश कंदील,फटाके, पणती,रांगोळीचे साहित्य खरेदीसाठी दुकानांवर थोडीफार गर्दी जाणवत आहे.
      सर्वत्र मोठी खरेदी व विविध प्रकारचे गोडधोड व आनंद द्विगुणीत करणारा सण म्हणजे दिवाळी.दरवर्षी दिवाळी सणाच्या पार्श्र्वभूमीवर मोठय़ा प्रमाणात उलाढाल होते. यंदा हा सण अवघ्या पाच ते सहा दिवसांवर येऊन ठेपला असून साहीत्य व वस्तु खरेदीसाठी संपूर्ण बाजारपेठ सजली असली तरी विविध प्रकारचे तयार कपडे, मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस, विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य,अत्तर,फटाके, फराळाचे साहित्य पणत्या,केरसुणी, आकाश कंदील, पूजेचे साहित्य,विविध रंगांच्या रांगोळ्या आदीसह विविध प्रकारचे स्टॉल व दुकानांना ग्राहकांची प्रतिक्षा लागून आहे. 
        दिवाळीत लक्ष्मीपूजन, धनत्र्योदशी, भाऊबीज, पाडवा या सणासाठी खास पारंपरिक साहित्य येथील बाजारपेठेत उपलब्ध होत असल्याने परिसरातील नागरिक येथे खरेदीसाठी येऊन खरेदी करीत असल्याने सर्वत्र गजबज पाहवयास मिळते. मात्र सण पाच दिवसांवर येऊनही अद्याप हवे तशी बाजारपेठेत गर्दी जाणवत नसल्याने सर्वत्र शुकशुकाट पाहवयास मिळत आहे. येणारा गुरुवार हा दिवाळीच्या दरम्यान येणारा शेवटचा आठवडे बाजार असून या आठवडे बाजारात लोकांची गर्दी पाहायला मिळेल की नाही या विषयी संभ्रमच आहे. 

आजही ग्रामीण भागात सणाच्या पूर्वसंध्येला भरणाऱ्या शेवटच्या आठवडे बाजाराला ‘सण बाजार’ म्हटले जाते. एरवी दैनंदिन खरेदीपेक्षा वेगळे असे या बाजाराला जत्रेचे स्वरूप येत असते. परंतु यंदा या आठवडे बाजारात दिवाळीचा दिवसांत हे चित्र दुर्मिळ जाणवत आहे. तरीही थोडाफार पदरी पडणाऱ्या कापसामुळे सणांत गोडवा निर्माण झाला आहे.


दिवाळीच्या फराळाला महागाईचा तडका जाणवत असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा फराळाचे पदार्थ तीस ते चाळीस रुपयांनी महागले आहेत, तर दुसरीकडे दुष्काळी स्थितीमुळे बहुतांश गृहिणी स्वतः घरीच फराळाचे पदार्थ बनविण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र पाहवयास मिळते. त्यामुळे फराळ व्यावसायिक चिंतेत आहे.चिवडा, लाडू, शेव, मोतीचूर, चकल्या आदी पदार्था ना बऱ्यापैकी मागणी असल्याचे व्यवसायिक महेंद्र शिंदे यांनी सांगितले, तर गतवर्षीच्या तुलनेत आतापावेतो यंदा केवळ तीस टक्के धंदा झाल्याचे दुकानदार शरिफ मन्यार यांनी सांगितले.

येत्या या पाच – सहा दिवसांच्या काळात ग्राहक खरेदीसाठी गर्दी करणार असल्याची आस व्यावसायिकांना लागून आहे. बाजारपेठेत सर्वत्र चिनी पणत्या आल्याने मातीच्या पणत्या नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसते. दिवाळी सण दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. सर्वाधिक दिवे लावून परिसर प्रकाशमय केला जातो. यासाठी ‘पणत्या’ वापरल्या जातात. परंतु पारंपारिक पध्दतीने वापरात असलेल्या मातीच्या पणत्यांची आकर्षक दिसणाऱ्या प्लॅस्टिक, इलेक्ट्रॉनिक पणत्यांनी जागा घेतली. बाजारात विक्रीस आलेल्या या इलेक्ट्रॉनिक पणत्या दिसण्यास आकर्षक असल्याने कुंभारांच्या मातीच्या पणत्या विक्रीवर परिणाम झालेला दिसून येतो.बाजारपेठेत तुर्तास केवळ मोबाईल खरेदीसाठी मोठी गर्दी होऊन अलिकडील पंधरा दिवसांत कोट्यांवधींची उलाढाल झाल्याचे व्यापाऱ्याने सांगितले.

Views: 101
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
ब्रेकिंग न्युज…. खानापूर ..आटपाडी मतदार संघातून महाविकास आघाडी तर्फे अॅड. वैभव पाटील यांची उमेदवारी जाहीर

ब्रेकिंग न्युज.... खानापूर ..आटपाडी मतदार संघातून महाविकास आघाडी तर्फे अॅड. वैभव पाटील यांची उमेदवारी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)