संतोष हेगडे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
आटपाडी
खानापूर मतदारसंघातून बहुजन समाज पार्टीचे खानापूर विधानसभा अध्यक्ष संतोष हेगडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल यांच्याकडे आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
बहुजन समाज पार्टीचे खानापूर विधानसभा अध्यक्ष संतोष हेगडे हे खानापूर मतदारसंघांमध्ये वारंवार आंदोलनाच्या माध्यमातून चर्चेत असतात.बहुजन समाज पार्टीमध्ये प्रामाणिकपणे काम केले. परंतु काही पक्षांतर्गत कुरघोड्यामुळे पक्षाच्या वरिष्ठांनी संतोष हेगडे यांना एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे संतोष हेगडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
परंतु खचून न जाता जनतेचा सेवक म्हणून मतदारसंघामध्ये मी सदैव काम करीत राहणार. सध्याची वाढती महागाई, बेरोजगार , वैद्यकीय सेवा, उच्च शिक्षण या प्रश्नासाठी ते आवाज उठवत असतात. तसेच मतदारसंघातील सामान्य गोरगरीब कष्टकरी कामगार, मजूर, शेतकरी यांच्या न्याय हक्कासाठी लढत असतात. मतदारसंघामध्ये निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधकामे करून प्रस्थापित मंडळी आपली संपत्ती वाढवण्यात मग नाहीत परंतु मतदारसंघातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. मतदारसंघातील तरुणांच्या हाताला काम नाही रोजगार नाही. आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आणि पाठबळाच्या जोरावर निवडणूक लढविण्यासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खानापूर मतदारसंघात परिवर्तन घडविण्यासाठीच विधानसभा निवडणुकीच्या मैदानात ताकदीने उतरणार असल्याचे संतोष हेगडे यांनी सांगितले.