काही लोकांचा दिवसभर मोबाईलवर टाइमपास
अनेक वापरकर्त्यांना मेसेज व फोन नंबर सुद्धा सेव्ह करता येत नाही
त-हाडी / प्रतिनिधी
त-हाडी : आजच्या या मॉडर्न युगात फोन वापरणे ही दैनंदिन गरजच नव्हे तर एक फॅशन झाली आहे. एक वेळा जेवण नसले तरी चालेल पण फोन असला पाहिजे अनेक तरुण-तरुणीसह महिला पुरुष मोबाईलपायी वेडे झाले आहेत. आज देशात करोडो लोकांकडे मोबाईल आहेत, यापैकी लाखो लोक स्मार्टफोन वापरतात. येत्या पाच ते सहा वर्षात करोडो स्मार्टफोन वापरकर्ते वाढतील असा काही तज्ञ व अभ्यासू लोकांचा अंदाज आहे, पण असे असले तरीही अर्ध्या अधिक लोकांना मेसेज किंवा फोन नंबर सेव्ह करता येत नसून केवळ मनोरंजन म्हणून मोबाईल वर टाईमपास करत बसतात. संगणकीय व मोबाईल ज्ञान ग्रामीण भागातील काही तरुणांना
फारच कमी असल्याचे दिसून येते कारण परिसरात अनेक गावात जे नागरिक शिकले नाहीत किंवा साक्षर नाहीत अशाही महिला पुरुषांकडे आता स्मार्टफोन दिसून येत आहे. मजुर वर्ग तर सर्रास केवळ टाईम पाहण्यासाठी मोबाईलचा वापर करत आहेत तर अनेक हायस्कूल व कॉलेजच्या तरुण-तरुणी गेम खेळण्यात व्यस्त असतात.
अनेक नागरिकांना व तरुण- तरुणींना संगणक फोल्डर कसे तयार करावे हे सुद्धा माहित नाही. अनेकांना डॉक्युमेंट्स मधील माहिती कॉफी व पेस्ट करता येत नाही तर बऱ्याच नागरिकांना व महिलांना साधा फोन नंबर सुद्धा स्वतःच्या मोबाईल मध्ये सेव्ह करता येत नसून ते अनेकांकडून फोन नंबर सेव करून घेत असल्याचे आढळून येते. एकंदरीत अनेक तरुण-तरुणींना व महिला पुरुषांना मोबाईलची गरज नसताना केवळ मनोरंजन व टाइमपास म्हणून फोन वापरतात यापैकी अनेक नागरिक स्मार्टफोन वापरत असल्याचे दिसून येत आहे आणि नेमका याच संधीचा फायदा घेत मोबाईल कंपन्यांनी आपले रिचार्ज भरमसाठ वाढवले असल्याचे काही तज्ञ व अभ्यासू मंडळी कडून सांगण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागात अनेक नागरिकांची फोनमध्ये रिचार्ज टाकण्याची सोय नसल्याने किंवा त्यांना कधीच कोणाचे फोनही येत नसल्याने अशा नागरिकांचे फोन एक शोभेची वस्तू म्हणून घरी पडले असतात व काम धंदा सोडून अनेक जण मोबाईलवर टाइमपास करत बसतात हे वास्तव आहे.