IMG_20240927_100525Downखानापूर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे प्रकाश गायकवाड यांचा अपक्ष उमेदवार अर्ज दाखल
आटपाडी प्रतिनिधी
:खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून मनसेचे प्रकाश गायकवाड यांनी अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला आहे.प्रकाश गायकवाड यांनी गेल्या अनेक वर्षापासून आटपाडी व खानापूर तालुक्यामध्ये सामाजिक कार्य करुन,प्रशासकीय कार्यालयातील गैर कामकाजां बद्दल त्यांनी वेग वेगळ्या विविध आंदोलनाच्या माध्यमातून मतदार संघामध्ये ओळख निर्माण केली आहे.तसेच त्यांनी दुष्काळात चारा छावण्या चालू करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव दर मिळण्यासाठी,शेतकऱ्याच्या दुधाला दर मिळण्यासाठी, कारखान्याकडून शेतकऱ्यांची ऊस बिल मिळण्यासाठी अशी अनेक आंदोलन केले आहेत.
त्याचबरोबर वर्ग तीन चे कर्मचारी मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्यासाठी महसूल कर्मचारी मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्यासाठी रस्त्याच्या निकृष्ट कामासाठी पीडब्ल्यूडी चा पंचनामा कृषी सेवा केंद्राकडून शेतकऱ्याची होत असणारे लूट थांबवण्यासाठी तसेच अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्यासाठी आणि तालुक्यातील शिवभोजन मधील ताफावत शासनास निदर्शनास आणुन देऊन योग्य न्याय गोरगरीब जनतेला देण्याचे काम असो व नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पोलीस स्टेशन कडून होणाऱ्या सामान्य जनतेच्या त्रासाला असे अनेक गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करीत या सर्व गोरगरीब वंचित शेतकरी व सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने ही निवडणूक लढवत आहे.ही सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस म्हणून सर्वांनी पाठीशी उभारावे ही विनंती करीत त्यांनी उमेदवारी अर्ज निवडून अधिकारी विक्रमसिहं बांदल यांच्या कडे दिला आहे.
यावेळी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेना आटपाडी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बसरकोडे, खानापूर तालुकाध्यक्ष साजिद आगा तालुकाध्यक्ष संजय पाटील,विटा शहराध्यक्ष कृष्णा देशमुख,विटलापूर विकास सेवा सोसायटीचे संचालक गणेश यादव, आप्पासाहेब गायकवाड, निलेश यादव,जालिंदर गायकवाड, महेश गायकवाड, विकास घाडगे, जयंत गायकवाड,विठ्ठल जाधव, समाधान जगदाळे, सतीश शिंदे, राहुल जगदाळे, राहुल साळुंखे, माळेवाडीचे माझी डेप्युटी सरपंच लालासाहेब जाधव,सचिन शेठ गायकवाड सागर जगदाळे इत्यादी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होतेload