प्रदूषणमुक्त,पर्यावरणपूरक दिवाळी करूया:आणि २०नोव्हेंबरला मतदान
महापर्व;लोकशाहीचा सन्मान करूया!
-प्रशासक अधिकारी – आर, जी, पावरा
त-हाडी- प्रतिनिधी
दीपोत्सव साजरा करताना आपला आनंद इतरांसाठीच नव्हे, तर आपल्या स्वत:साठीही नुकसानदायी ठरणार नाही ना, याचा विचार केला जाणे गरजेचे आहे. फटाक्यांमुळे होणारे वायू व ध्वनिप्रदूषण टाळून पर्यावरण जपायला हवं आपला सारांशदीपावली हा आनंदाचा, उत्साहाचा सण असल्याने चिंता करण्यासारखे मुद्दे कमी नसताना तो साजरा करण्याची एव्हाना सर्वांचीच तयारी आहे.
अंधारलेल्या काळोखावर सकारात्मकतेचा,आशेचा दीप लावला तर अंधार दूर होण्यास नक्कीच मदत घडून येईल. हा काळोख अगर अंधार केवळ समस्या, विवंचनांचाच नाही. तो पर्यावरणाला बाधा पोहोचविण्यासाठी ही दिवाळी साजरी करताना विशेषत प्रदूषणमुक्तीचा प्रकाश उजळण्याची गरज आहे.आनंदाच्या कल्पना काहीशा बदलून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करूया;यासोबतच
विधानसभेसाठी २०नोव्हेंबर २०२४ एकाचटप्प्यात मतदानप्रक्रिया पारपडणार आहे. लोकशाहीसुदृढ व देशाच्या विविधांगी विकासाला गतीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावण्याची गरज असून, प्रत्येकाने मतदान प्रक्रियेत स्वयंस्फुर्तीने सहभागीहोऊन
मतदानकरणे म्हणजे देशसेवाच घडले व परीणामी मतदानाची टक्केवारी वाढेल, अशी अपेक्षा त-हाडी ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष प्रशासक आर जी पावरा यांनी व्यक्त केली आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, म्हणुन मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतो,
असा विचारही मनात आणू नये कारण एका-एका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो. यामुळेप्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्या बरोबरच लोकशाही अधिकसक्षम करण्यासाठी आपलाही खारीचावाटा उपयुक्त ठरवून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्कबजावावा व लोकशाही बळकट करण्यासाठी राज्यघटनेने सर्वांना समान मताचा अधिकार दिला आहे. तोअधिकार बजावणे प्रत्येकमतदार राजाचे कर्तव्य आहे. मतदानाचा उच्चांक गाठून हे म्हणणे खरे ठरवतील,असा विश्वासही त-हाडी प्रशासक कर्तव्यदक्ष प्रशासक आर पावरा यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला आहे.