• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

‘ जिवनात हवी हिरवळ, कारण हिरवळ हेच जिवण आहे ‘

माणगंगा by माणगंगा
August 17, 2021
in मुंबई
0
‘ जिवनात हवी हिरवळ, कारण हिरवळ हेच जिवण आहे ‘

‘ जिवनात हवी हिरवळ, कारण हिरवळ हेच जिवण आहे ‘

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

ठाणे : ‘निसर्ग हिरवा आहे, हिरवा रंग समृद्धीचा रंग आहे, तो प्रत्यक्ष हरीचा स्वभाव आहे, म्हणून आनंदी-सुखी-निरोगी जिवण जगण्यासाठी त्यात हिरवळ असणे अत्यंत गरजेचे आहे, कारण हिरवाई हेच जीवन आहे ‘, अखिल भारतीय अग्रवाल संमेलन (ठाणे) व अग्रोहा विकास ट्रस्ट, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने डव्ह बँक्वेट हॉल, महेश विदर्भ भवन, ठाणे (प) येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ हरियाली तीज महोत्सव ‘ या भव्य सोहळ्यात असे मार्गदर्शन ज्येष्ठ समाजसेवक-औद्योजक व अखिल भारतीय अग्रवाल संमेलन, ठाणे चे चेअरमन महेश बंसीधर अग्रवाल यांनी केले.

राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली, हरयाणा आदि उत्तरभारताच्या राज्यांमधील सुवासिनींचे पारंपारिक सण असलेले हरियाली तीजच्या निमित्ताने आयोजित, करण्यात आलेल्या या सोहळ्याचे संयोजक अखिल भारतीय अग्रवाल संमेलन, ठाणे चे अध्यक्ष सुभाष अग्रवाल व अग्रोहा विकास ट्रस्ट, ठाणे चे अध्यक्ष राजेश हलवाई हे होते, तर समारंभाचे अध्यक्षस्थान महेश बंसीधर अग्रवाल यांनी भूषविले. सोहळ्यात मोठ्या संख्येने राजस्थानी समाजातील बंधू-भगिनींसह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी झाले होते. सदरप्रसंगी या ठिकाणी नावाजलेल्या रितू शर्मा अँड डान्स पार्टीच्या वतीने गीत-संगीत, नृत्य, हास्याचे कारंजेसह विविध सांस्कृतिक-पारंपारिक-मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले होते. समारंभात हमखास राजस्थानी ठसक्यात पारंपारिक वेशभूषेत उपस्थित जमावाने संपूर्ण सभागृहात अशी वातावरण निर्मिती केली, जणू महाराणा प्रतापांच्या शौर्याने चमकणाऱ्या राजस्थानची शूरभूमीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली परंपरा असलेल्या या महान संतभूमीवर अवतरली आहे, अशी माहिती अखिल भारतीय अग्रवाल संमेलन या संस्थेच्या राष्ट्रिय चिटणीस सौ. सुमन अग्रवाल यांनी दिली.

या प्रसंगी सर्व महिलांना गिफ्ट हॅम्पर देण्यात आले, त्यांनी गाणी-संगीत व लोकगितांच्या तालावर नृत्याचा अफाट आनंद घेतला आणि मेंदी व टॅटूच्या कलात्मक डिझाईन्सही याप्रसंगी बनवून घेतल्या. याच्यासह, प्रत्येकाने डाळ-बाटी, चुरमासह विविध राजस्थानी खाद्यपदार्थांचा आस्वाददेखील घेतला. कार्यक्रमात प्रामुख्याने सुरेश पहाडिया, अनिल अग्रवाल, अनिल गोयल, नितीन बंजारी, विजय चौधरी, राजीव अग्रवाल, माधवी गुप्ता इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने लोकं उपस्थित होती.

Views: 292
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
नवे कोळदे येथील मोतीलाल पाटीलांनी मोतीश्रीच्या स्मरणार्थ चाळीस हजाराचे भजन साहित्य भेट…

नवे कोळदे येथील मोतीलाल पाटीलांनी मोतीश्रीच्या स्मरणार्थ चाळीस हजाराचे भजन साहित्य भेट…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)