नवे कोळदे येथील मोतीलाल पाटीलांनी मोतीश्रीच्या स्मरणार्थ चाळीस हजाराचे भजन साहित्य भेट…
प्रतिनिधी, समाधान ठाकरे, दोंडाईचा
दोंडाईचा- (श. प्र.) शिंदखेडा तालुक्यातील नवे कोळदे येथील शेतकरी वरनेश्वराय दूध डेअरीचे व बिल्डिंग मटेरियल सप्लायरचे मालक मोतीलाल उत्तमराव पाटील यांच्या मातोश्री कै. ग. भा. निलाबाई उत्तमराव पाटील यांच्या स्मरणार्थ गावातील भजन मंडळीला 40 हजार रुपयाचे साहित्य भेट देण्यात आले आहे.
महाराष्ट्र ही संतांची भूमी या संतांची परंपरा लाभलेल्या भूमित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगेबाबा यांच्या सारखे अनेक महान संत होऊन गेलेत, त्यांनी भजन कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करुन लोकप्रबोधन केले. आजही अनेक गांवात भजन कीर्तनाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर, गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांसारख्या महान संतांचा वारसा पुढे नेन्याचे कार्य सुरू आहे. नवे कोळदे ता. शिंदखेडा येथील दूध डेअरी व बिल्डिंग मटेरियल सप्लायरचे मालक शेतकरी मोतीलाल उत्तमराव पाटील यांनी गावातील भजनी मंडळ हे सांप्रदायिकता टिकवत आहे तसेच त्यांना भजन गाण्यासाठी साहित्याची कमतरता भासत होती म्हणून यांनी लक्ष केंद्रित करत गावातील भजन मंडळींना तब्बल चाळीस हजार रुपये किमतीचे साहित्य आणून त्यांच्या मातोश्री कै. ग. भा. निलाबाई उत्तमराव पाटील यांच्या स्मरणार्थ सप्रेम भेट दिले आहे.
भजन साहित्य भेट दिल्याप्रसंगी राजेंद्र पाटील, अशोक पाटील, लोटन पाटील, प्रभुनाथ गुरव, रमेश गुरव, राजू भाईजी, रमेश पाटील, राजधार पाटील, आनंद पाटील, रवींद्र पाटील, युवराज मिस्तरी विठ्ठल बैरागी, दायराम पाटील, यासह आदी उपस्थित होते. याप्रसंगी गावातील भजन मंडळीने श्री पाटील यांचे आभार माण्यात आले.







