माधुरी भिमराव भोसले यांना जिजाऊ सावित्री पुरस्कार प्रदान
मैत्रेय फाऊंडेशन, वावरहिरे या सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या कु. माधुरी भिमराव भोसले यांना उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल सुजन फाउंडेशन व ग्रामस्वराज्य युवा सामाजिक संस्था, खंडाळा यांच्या वतीने म. ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वंशज नीताताई होले यांनी “जिजाऊ – सावित्री 2025” हा पुरस्कार देऊन सन्मानित केले.
मैत्रेय फाउंडेशन, वावरहिरे या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून माधुरी भोसले यांनी पाणी व्यवस्थापन, एकल महिला, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, शैक्षणिक गुणवत्ता, वृक्षारोपण, ग्राम स्वच्छता अभियान, शासकीय योजनांची माहिती, महिला सक्षमीकरण, कोरोना काळात लोकप्रबोधन, अन्नधान्य वाटप, महिलांकरता ब्युटी पार्लरचे क्लासेस, लोकसेवेसाठी प्रथम पुढाकार घेऊन नेतृत्व उभे करून तालुक्यात विविध कार्यक्रम राबवले आहेत. सध्या त्या पंचायत समिती माण येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानच्या तालुका व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत.
तसेच नेहरू युवा केंद्राच्या माण तालुका प्रतिनिधी म्हणून युवक गटांसोबत त्यांनी सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत. विविध सामाजिक कार्य उल्लेखनीय केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. यावेळी शितल नहांगरे, समीना शेख, प्रिया ननावरे, अंबिका देशमाने, निखिल राऊत, प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते. प्रस्ताविक अजित जाधव यांनी केले. सूत्रसंचालन ज. तु. गारडे यांनी केले. आभार संदीप ननावरे यांनी मानले.