चिमुकले विद्यार्थी बनले भाजीपाला विक्रेते
मरडवाक येथे ‘बालआनंद बाजाराचे’ आयोजन
मायणी दि.१७ :- वार्ताहर
मरडवाक ता. खटाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने दप्तरमुक्त आनंदायी शनिवार'
अभियानांतर्गत गत शनिवारी आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील चिमुकले विद्यार्थी छोटे व्यापारी बनून भाजीपाला , खाऊचे पदार्थ विक्री करताना दिसत. होते. यावेळी ग्रामस्थांनी उस्फुर्त पणे या बाजारात दाखल होताना छोट्या व्यापारी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या मालाची खरेदी केली.
या उपक्रमाचे उदघाटन मरडवाक चे लोकनियुक्
सरपंच संतोष चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच पांडुरंग जाधव,
शाळा व्यवस्थाक समिती अध्यक्ष भाऊसो घुसाठे यांच्यासह सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.
या उपक्रमाचे आयोजन करण्या-मागील उद्देश हा शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवहारिक ज्ञान मिळावे.असा आहे तसेच श्रमप्रतिष्ठा या मूल्यांचा
जोपासना करण हा ही यामागील हेतू आहे .या आठवडे बाजारात विद्यार्थ्यांनी मरडवाक ता. खटाव येथील जिल्हा
भाजीपाला, फळे, खाऊचे पदार्थ अशा .विविध वस्तूंची दुकाने थाटली होती.सर्व ग्रामस्थांनी या बाजारात उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. तसेच या बाजारात सुमारे पाच हजार रुपयांची उलाढाल झाली. यावेळी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी उपक्रमाचे नियोजन उत्तम केले .