इंदू मिलच्या स्मारकावरील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळयाचे बांधकाम मजबूत करा,
संदेश आंबेडकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार…
मुंबई, भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा साडेचारशे फुटाचा इंदू मिलच्या राष्ट्रीय स्मारकावर उभारण्यात येणारा भव्य पुतळा अधिक मजबूत बांधकामामध्ये उभा करावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संविधान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश आंबेडकर हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती डॉ. राजन माकणीकर यांनी दिली आहे.
इंदू मिलच्या स्मारकावर उभारण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे बांधकाम करण्यासाठी प्रसिद्ध मूर्तीकार राम सुतार यांना देण्यात आले असून काही निधी त्यांना वितरित करण्यात आला आहे. मात्र या पुतळ्याचे बांधकाम पूर्ण झालेले नसून अर्धवट अवस्थेत आहे. मात्र राम सुतार यांचे वृद्धापामुळे कामामध्ये अडथळा येत आहे. त्यामुळे पुतळ्याच्या कामात काही त्रुटी निर्माण होऊ शकतात.
सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा कोसळल्यानंतर अधिक खबरदारी म्हणून हा पुतळा अधिक मजबूत समुद्रकिनारा असल्याने बांधकाम होणे आवश्यक असल्याने याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन काही बाबी त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याची माहिती संदेश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे,
इंदू मिलचे स्मारक गेले अनेक वर्ष रखडले असून कामाला गती मिळावी त्याबाबत ही आढावा घेतला जाणार असल्याचे रिपब्लिकन संविधान पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी सांगितले.