जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडसे वस्ती येथे 76 वा प्रजासत्ताक दिन 2025 उत्साहात साजरा
विश्वजीत गोरड/ पिलीव- प्रतिनिधी
76 वा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2025 हा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नवनाथ गुलाब गोडसे व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून सलामी देऊन राष्ट्रगीत महाराष्ट्र गीत झेंडा गीत झाले . नंतर सर्व विद्यार्थ्यांनी खडे कवायत, साहित्य कवायत व बैठे कवायत प्रकार उत्कृष्ट केले. तदनंतर विद्यार्थ्याने प्रजासत्ताक दिनानिमित्त मराठी,हिंदी, इंग्रजी या भाषेतून आपले देशप्रेम भाषणातून व्यक्त केले.
नंतर उपस्थित सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, माजी शिक्षक,आरोग्य आशा सेविका, अंगणवाडी सेविका पालक व ग्रामस्थ या सर्वांचे स्वागत केले.
कोळेगाव केंद्र स्तर क्रीडा स्पर्धेत गोडसेवस्ती शाळेला घवघवीत यश सन 2024-25 कबड्डी मुली – विजेता ( प्रथम क्रमांक)कबड्डी मुले – उपविजेता (द्वितीय क्रमांक )खो खो मुले – तृतीय क्रमांक खो खो मुली – तृतीय क्रमांक तसेच विशेष म्हणजे पिलिव बिट स्तर क्रीडा स्पर्धेत कबड्डी मुली उप विजेता या मिळालेल्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नवनाथ गोडसे यांनी मुले व मुली प्रत्येकी 200 पानी वही (रक्कम 500 रुपये) व उपाध्यक्ष श्री अर्जुन पिसे यांनी मुले मुली खेळाडू यांना प्रत्येकी पेन (रक्कम 175 रुपये) बक्षीस दिले.
सांस्कृतिक कार्यक्रम-2025
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडसेवस्ती ही शाळा वाडी वस्तीवरील असून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेने सांस्कृतिक कार्यक्रम उत्कृष्टरित्या सादरीकरण झाले. आजचे या सास्कृतिक कार्यक्रमासाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच पालकांनी व ग्रामस्थांनी 15 खुर्च्या (रक्कम-10500 रुपये) शाळेसाठी देण्याचे घोषित केले केले. यामध्ये शाळेसाठी खुर्ची देणगी देणारे व्यक्ती पुढील प्रमाणे….
1) रघुनाथ संदिपान गोडसे 2) नवनाथ गुलाब गोडसे 3) सत्यवान बुवाजी मुंजे 4) बिरुदेव बाळू गेंड 5) दत्ता ज्ञानेश्वर गोडसे 6) संतोष औदुंबर शिंदे 7) आगतराव भीमराव काळेल 8) दादासो हरिदास काळेल 9) दीपक जयराम गोडसे 10) मधुकर आप्पा गोडसे 11) दऱ्याप्पा बापूराव गोडसे 12) प्रताप कालिदास काळेल 13) आनंद भारत शिंदे 14) विजय बापू मुंजे 15) सुखदेव मारुती गोडसे.
या सर्वांचे शाळेच्या वतीने सन्मान करून आभार मानले.
तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. सर्जेराव शिवाजी शिंदे सर यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा सांगितला.उपस्थित सर्वांनी शाळेचे झालेल्या प्रगतीचे कौतुक केले.
सदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पालक ग्रामस्थ या सर्वांचे तसेच खाऊ देणाऱ्या सर्व पालकांचे शाळेच्या वतीने उपशिक्षक श्री. वस्ताद माने सर यांनी आभार मानले. अध्यक्षाच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता झाली.