किया मोटर्सने नुकत्याच लाँच केलेल्या किया सिरोस गाडीचा अनावरण समारंभ
सांगली येथे सौ. सुमनताई सुरेशभाऊ खाडे ह्याच्या हस्ते कोंडुसकर कियाच्या सांगली येथील शोरूम मध्ये थाटात पार पडला . ह्यावेळी कोंडुसकर किया चे सेल्स मॅनेजर सचिन पाटील, कोंडुसकर किआयचे सर्व कर्मचारी आणि मोठा ग्राहक वर्ग उपस्थित होते.
कियाने लाँच केलेल्या या गाडीमध्ये स्टायलिंग,परफॉर्मन्स आणि सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बरीच वैशिष्ट्ये दिलेली आहेत
अधिक आरामाकरिता सर्वोत्कृष्ट लेगरूम, हेडरूम आणि शोल्डर रूम तसेच सेगमेंट मध्ये पहिल्यांदाच व्हेंटिलेटेड आणि रिक्लाइनिंग मागील सीट येते.
सुरक्षिततेकरीता ADAS लेव्हल 2 आणि 20 सुरक्षा वैशिष्ट्ये, 360-डिग्री कॅमेरा, 6 एअरबॅग्ज येतात. विशेषकरून पॅनोरामिक सनरूफ, ३०-इंच इंफोटेनमेंट डिस्प्ले, हरमन ची ८ स्पिकरची प्रीमियम साउंड सिस्टम येते. किया सिरोस मध्ये 1.0-लिटर टर्बो पेट्रोल 6-स्पीड मॅन्युअल किंवा 7-स्पीड ऑटोमॅटिक व 1.5-लिटर टर्बो डिझेल 6-स्पीड मॅन्युअल किंवा 7-स्पीड ऑटोमॅटिक इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.
ग्राहकांनी किया कोंडुस्करच्या कोल्हापूर रोड येथील शोरूमला भेट देऊन गाडीची माहिती घेऊन टेस्ट ड्राईव्ह चा लाभ घ्यावा असे आवाहन बिसनेस हेड अमोल पिसाळ यांनी केले आहे.