आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न*
शिरपूर : येथील आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन यावर्षीही उत्साहात पार पडले. यात विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमातुन ‘उत्सवाचा रंग’ या थीमवर नृत्य सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली.
शहरातील आर.सी.पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.
कार्यक्रमाचे उदघाटन तालुक्याचे आमदार मा. काशीरामदादा पावरा,संस्थेच्या सचिव सौ. रेषा पटेल,पंचायत समिती शिरपूरचे बी. डी. ओ प्रदीप पवार,गटशिक्षणाधिकारी एस. जे. सुरवाडकर, अनिल बाविस्कर,संस्थेचे सी. ई. ओ डॉ. उमेश शर्मा, अकॅडमिक इन्चार्ज पी. व्ही. पाटील, नगरसेविका संगीताबाई देवरे, ऍडव्होकेट शालिनी सोनवणे, केंद्रप्रमुख प्रवीण मराठे, शालेय पोषण आहार पंचायत समिती चे मनोहर वाघ तसेच शिक्षक-पालक संघाचे सर्व सदस्य,शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ,शाळेचे प्राचार्य पी.आर.साळुंखे व विविध शाखांचे प्राचार्य उपस्थित होते
प्रास्ताविकात प्राचार्य पी.आर. साळुंखे यांनी विद्यालयाच्या वार्षिक शालेय गुणवत्तेचा पट मानताना वर्तमान काळात विद्यालयात सुरू असलेल्या गुणवत्तापूर्ण उपक्रमाबद्दल माहिती दिली.विविध विद्यार्थ्यांनी जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या यशाचा उल्लेख केला. दरवर्षी यशाची परंपरा कायम असल्याचे सांगून शाळेतील असंख्य विद्यार्थ्यांनी यशाचा पल्ला गाठल्याचे सांगितले.
‘ उत्सव रंगाचा’ हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा प्रमुख विषय होता. कार्यक्रमात एकुण २० नृत्यप्रकारात एकुण ५८२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.उत्सहाचा रंग या थीम अंतर्गत लाल, पांढरा, पिवळा, हिरवा,गुलाबी,भगवा,काळा, निळा,
तिरंगा,खाकी रंग,मेहनतीचा रंग, आधुनिकतेचा रंग, उत्साहाचा रंग, सप्तरंग अशा विविध रंगातून गणेश वंदना,विठ्ठल विठ्ठल, आई जगदंबे, कोळीनृत्य, खंडोबाची कारभारीण, मोबाईल थीम,देशभक्तीपर गीत,माईम आर्ट,शेतकरी नृत्य, पोलीस- सिंघम नृत्य,होळी नृत्य इत्यादी नृत्यप्रकारतून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कला सादर करत रसिकांची मने जिंकली.
उत्सव रंगाचा या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे विशेष म्हणजे विद्यालयील विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रम्हा, विष्णू, महेश व देवर्षी नारदाच्या संवादपर निवेदनातून केले.यामुळे रंगांचा उत्सव अधिक रंगतदार झाला. तसेच कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन विद्यालयाचे पर्यवेक्षक एन. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. सीमा जाधव,पी. वाय. शिरसाठ, सुजित जाधव बी. व्ही. मोरे, सोनाली पाटील, कपिल बाविस्कर, जे. जे. माळी, आर. ए. जोशी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.


