• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

निरंकारी मिशनच्या ‘प्रोजेक्ट अमृत’चा तिसरा टप्पा‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या दिशेने एक सार्थक पाऊलखानापूर परिक्षेत्रामध्ये पापनाशी ओढा या ठिकाणी या अभियानाचे आयोजन

माणगंगा by माणगंगा
February 21, 2025
in Uncategorized
0
निरंकारी मिशनच्या ‘प्रोजेक्ट अमृत’चा तिसरा टप्पा‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या दिशेने एक सार्थक पाऊलखानापूर परिक्षेत्रामध्ये पापनाशी ओढा या ठिकाणी या अभियानाचे आयोजन

निरंकारी मिशनच्या ‘प्रोजेक्ट अमृत’चा तिसरा टप्पा
‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या दिशेने एक सार्थक पाऊल
खानापूर परिक्षेत्रामध्ये पापनाशी ओढा या ठिकाणी या अभियानाचे आयोजन


दिल्ली, 21 फेब्रुवारी, 2025:- संत निरंकारी मिशनची सेवा भावना आणि मानव कल्याणाचा संकल्प साकार करण्याच्या हेतुने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ परियोजनेच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ रविवार, दि.23 फेब्रुवारी 2025 रोजी परम श्रद्धेय सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि सत्कारयोग्य निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात यमुना नदीच्या छठ घाट, आई.टी.ओ., दिल्ली येथे केला जात आहे. जल संरक्षण व स्वच्छतेच्या प्रति जागरूकता निर्माण करणे हा या परियोजनेचा उद्देश आहे,जेणेकरुन भावी पिढ्यांना निर्मळ जल आणि स्वस्थ पर्यावरणाचे वरदान प्राप्त होऊ शकेल.


संत निरंकारी मिशनने बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या प्रेरणादायक शिकवणूकींना आत्मसात करत वर्ष 2023 मध्ये संस्कृति मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहयोगाने ‘प्रोजेक्ट अमृत’चा शुभारंभ केला गेला. या दिव्य पुढाकाराचा उद्देश केवळ जलस्रोतांची स्वच्छता सुनिश्चित करणे इतकाच नसून जल संरक्षणाला मानवी जीवनाचे अभिन्न अंग बनविण्याचा विचार विकसित करणे हा आहे. नद्या, सरोवरे, तलाव, विहिरी आणि झरे यांसारख्या प्राकृतिक जलस्रोतांची स्वच्छता व संरक्षणाला समर्पित या महाअभियानाच्या पहिल्या दोन टप्प्यांना अभूतपूर्व यश प्राप्त झाले आहे.

याच प्रेरणेतून यावर्षी तृतीय टप्पा अधिक व्यापक, प्रभावी व दूरगामी दृष्टीकोनातून वाढविण्यात आला आहे ज्यायोगे हे अभियान सातत्याने विस्तारीत होऊन समाजामध्ये जागरुकता, सेवा आणि समर्पणाची एक सशक्य लाट उत्पन्न करु शकेल.


संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय श्री.जोगिंदर सुखीजाजी यांनी माहिती देताना सांगितले, की हे बृहत अभियान देशभरातील 27 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 900 पेक्षा अधिक शहरांमध्ये 1600हून अधिक ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात येईल. या महाअभियानाची ही अभूतपूर्व व्यापकता त्याला एक ऐतिहासिक स्वरूप देईल ज्यातून जल संरक्षण व स्वच्छतेचा संदेश अधिक प्रभावशाली रीतीने जनसामान्यांपर्यंत पोहचू शकेल.


खानापूर या परिक्षेत्रामध्ये पापनाशी ओढा या ठिकाणी हे अभियान राबविण्यात येत असून त्यामध्ये शेकडोंच्या संख्येने निरंकारी सेवादलाचे स्वयंसेवक व अन्य भक्तगण भाग घेणार आहेत.


दिल्लीमध्ये हे अभियान पूर्वीप्रमाणेच ‘आओ सवारें, यमुना किनारे’ (चला सावरु यमुनेचे किनारे) या प्रेरक संदेशासह आयोजित केले जात आहे. संत निरंकारी मिशनचे सुमारे 10 लाख समर्पित स्वयंसेवक आणि त्याबरोबरच इंद्रप्रस्थ, जे.एन.यू. व दिल्ली विद्यापीठासह विविध संस्थांच्या युवकांसमवेत जल संरक्षण आणि स्वच्छतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहचवला जाईल.

गीतांची संगीतमय प्रस्तुति, समूहगायन, जागरूकता सेमिनार आणि सोशल मीडियाच्या माध्ण्यमातून जलजनित रोगांच्या व स्वच्छतेच्या प्रति जागृती पसरविण्यात येत आहे. हा पुढाकार केवळ स्वच्छतेपर्यंत सीमित न ठेवता आजच्या युवापिढीला समाजकल्याणाच्या दिशेने सकारात्मक कार्य करण्यासाठी प्रेरित करण्याचे एक सशक्त माध्यम बनेल.
सतगुरु माता सुदीक्षाजी महाराजदेखील बहुधा हीच प्रेरणा देतात, की आपण या धरतीला आणखी सुंदर रुपात सोडून जावे. हे अभियान त्याच संकल्पाचे एक साकार स्वरूप आहे जे समाजाला जागरुकता, सेवा आणि समर्पणाच्या दिशेने पुढे घेऊन जाण्याचे कार्य करेल.

Views: 73
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आटपाडी चे सुपुत्र पांडुरंग हातेकर यांची पोलीस मित्र संघटनेच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

आटपाडी चे सुपुत्र पांडुरंग हातेकर यांची पोलीस मित्र संघटनेच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)