अंधेरी पश्चिम मधील अंबोली स्मशानभूमी दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवल्याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महानगरपालिका विरोधात निषेध आंदोलन
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: दुरुस्तीच्या नावाखाली अंधेरी पश्चिम येथील सीझर रोडवरील अंबोली हिंदू स्मशानभूमी पालिका प्रशासनाकडून १ डिसेंबर २०२४ पासून बंद ठेवण्यात आली आहे. स्मशानभूमी लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही आजपर्यंत पालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या या नियोजन शून्य निष्काळजीपणा मुळे जनतेत प्रचंड असंतोष आहे.
या निषेधार्थ काल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग प्रमुख श्री अनिल परव यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक श्री. संजय मानाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली खाली श्री. प्रसाद आयरे यांच्या पुढाकाराने स्मशानभूमी समोर शनिवार दि. ०१ मार्च २०२५ रोजी महानगर पालिकेचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी सर्व शिवसेना पदाधिकारी यांच्या सह अंधेरीतील नागरिक देखील निषेध नोंदविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील ३ महिन्यांपासून बंद असलेल्या स्मशानभूमीमुळे स्थानिक रहिवाशांना अंत्यसंस्कारासाठी लांब अंतरावर जावे लागते. तसेच रुग्णवाहिका चालक देखील शव स्मशानभूमी मध्ये नेण्याकरिता स्वतः च्या मनाप्रमाणे वाटेल ते दर आकारतात ज्यामुळे नागरिकांना मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
या सरकारच्या काळात जगण्यासोबत मरण देखील महाग आणि त्रासदायक झाले आहे अशी भावना यामुळे नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
स्मशानभूमी ही नागरिकांची मुलभूत गरज असून ती लवकरात लवकर सुरू होण्यासाठी प्रशासनाने त्वरित योग्य ती पावले उचलावीत ही मागणी या आंदोलना दरम्यान करण्यात आली.
या वेळी विभाग संघटक श्रीमती अनिता बागवे , विधानसभा संघटक सौ वीना टॉक, सह संघटक सौ ज्योत्सना दिघे, उपविभाग संघटक सौ संजीवनी घोसाळकर, प्राण्या सावंत, पूजा पाटील , शाखा प्रमुख दयानंद कड्डी , उदय महाले, सुधाकर आहिरे ,दीपक सणस, एकनाथ केलकर, रेवती सुर्वे
, छाया खानदेशी, मनाली पाटील, स्वाती तावडे तसेच ग्राहकच श्री मनोज जाधव इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .


