गुलाबराव पाटील पालकमंत्री म्हणून चाळीसगाव ची जबाबदारी घेणार
चाळीसगाव: लाडक्या बहिणीने करंट दिले म्हणून आम्ही सगळ्यांना चारी मुंड्या चित केले चाळीसगाव शिवसेनेची पालकमंत्री म्हणून संपूर्ण जबाबदारी मी घेतो व चाळीसगावला जी जी मदत लागेल ती मी करणार
आम्ही सर्वसामान्य शिवसैनिकांमधून पुढे आलेले कार्यकर्ते आहोत
तळागाळातील शिवसैनिकाची अडचण मला कळते शिवसेनेशी गद्दारी नव्हे तर बाळासाहेबांच्या विचारांशी एकरूप होऊन आम्ही भगव्याशी इमान राखण्याचे काम केले आहे म्हणूनच आम्ही इतरांना चारीमुंड्याचीत करून पुन्हा निवडणुकीत विजय मिळवला आहे चाळीसगाव तालुका शिवसेनेला जी जी मदत लागेल ती मी येणाऱ्या काळात करणारच आहे पालकमंत्री म्हणून चाळीसगावची संपूर्ण जबाबदारी मी घेणार असल्याचे प्रतिपादन चाळीसगाव येथील मेळाव्यात जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले
महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगाव शिवसेनेच्या . वतीने नामदार गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत चाळीसगाव तालुक्यातील 61 कॉमन मॅन लोकांचा सन्मान सोहळा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला यात चाळीसगाव तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक बांधकाम कामगार घरकाम करणाऱ्या महिला भाजीपाला विक्रेते महिला बस ड्रायव्हर वारकरी रक्तदाते नगरपालिका सफाई कर्मचारी अशा सर्वसामान्य व्यक्तिमत्त्वांचा सन्मान सोळा राजपूत मंगल कार्यालय येथे पार पडला
यावेळी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील शिवसेना नेते पप्पूदादा गुंजाळ शिवसेना प्रवक्ते प्रदीप देसले डॉक्टर सुनील राजपूत रामचंद्र जाधव भाऊसाहेब पाटील समाधान पाटील व शिवसेना तालुका राहुल पाटील, शहरप्रमुख सागर चौधरी शुभम राठोड शेखर गवळी सोमनाथ चौधरी महेंद्र पाटील मनीषा ताई महाजन प्रतिभाताई पवार अनिता शिंदे सुवर्णाताई राजपूत विनोद जाधव आकाश जाधव दीपक कुमावत दिनेश कासार जय राजपूत रोहित नवले दीपक गुंजाळ संजय पाटील त्रिशूल गोसावी यांच्यासह शिवसेना युवा सेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते


