• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

काँग्रेसवाल्यांनी रा. स्व. संघाबद्दल अशी फोकनाडबाजी करण्याचे थांबवणेच योग्य…ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
March 14, 2025
in Uncategorized
0
काँग्रेसवाल्यांनी रा. स्व. संघाबद्दल अशी फोकनाडबाजी करण्याचे थांबवणेच योग्य…ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

घ्या समजून राजे हो…

काँग्रेसवाल्यांनी रा. स्व. संघाबद्दल अशी फोकनाडबाजी करण्याचे थांबवणेच योग्य…

ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना मनुवादी विचारांची आहे. ही संघटना स्त्री-पुरुष समानता मानत नाही. त्यामुळेच आतापर्यंत संघाच्या प्रमुखपदी कोणीही महिला निराजमान झाली नाही अशा आशयाचे आरोप करणारे विधान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतेच बीड जिल्ह्यात बोलताना केले आहे. बीड जिल्ह्यात मस्साजोग येथे ९ डिसेंबर रोजी झालेली सरपंचांची हत्या आणि त्यानंतर गढूळ झालेले वातावरण बघून हर्षवर्धन सपकाळ यांनी मस्साजोगपासून एक सद्भावना यात्रा काढली होती. या सद्भावना यात्रेत बोलताना त्यांनी वरील विधान केले असल्याची बातमी माझ्या बघण्यात आली आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी अशा प्रकारचा कोणताही आरोप करताना अभ्यास करून बोलायला हवे, असा मला त्यांना प्रेमाचा सल्ला द्यावासा वाटतो. तसेही काँग्रेसमधल्या आजच्या पिढीत फारसे अभ्यास करून बोलणारे कोणी शिल्लक राहिलेले नाहीत असा अनुभव पत्रकार म्हणून वापरताना वारंवार येतो. जुन्या पिढीत यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शेषराव वानखेडे, वसंतराव साठे, वसंतदादा पाटील, विठ्ठलराव गाडगीळ, नरेंद्र तिडके, शंकरराव चव्हाण यांच्यासारखे अनेक अभ्यासू नेते बोलताना आम्ही बघितले आहेत. पत्र परीषदांमध्ये या नेत्यांना प्रतिप्रश्न विचारताना आम्हा पत्रकारांना देखील विषयाचा अभ्यास करून जावे लागत असे. अन्यथा आम्हालाही निरुत्तर व्हावे लागायचे. अगदी काल-परवापर्यंत आमच्या पिढीत म्हणजे साधारणपणे ६५ ते ७५ या वयोगटात असलेल्या काँग्रेस नेत्यांमध्येही फारसे अभ्यासू कोणी दिसत नाही. नाही म्हणायला पृथ्वीराज चव्हाण, अनंत गाडगीळ, गेव आवारी, दिवंगत डॉक्टर श्रीकांत जिचकार अशी काही अभ्यासू नेत्यांची नावे सांगता येतील. थोड्या जास्त वयाचे उल्हास पवार आणि सुशील कुमार शिंदे यांचाही दाखला अभ्यासू म्हणून देता येईल. आज मात्र अभ्यास करून बोलताना कोणीच दिसत नाही. त्यामुळेच अशी बिनबुडाचीविधाने केली जातात. अर्थात त्याला काँग्रेसजनांचाही दोष नाही. त्यांचे आजचे नेते राहुल गांधी हे तरी कुठे अभ्यास करून बोलतात? अन्यथा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर त्यांनी अनेक बिनबुडाचे आरोप केलेच नसते आणि स्वतःवर ठिकठिकाणी न्यायालयीन खटले ओढवूनही घेतले नसते.

हर्षवर्धन सपकाळ यांनी जे विधान केले त्याची सत्यासत्यता आपण तपासून बघायला हवी. उपलब्ध तथ्यांच्या आणि दस्तावेजाच्या आधारावर ही सत्यासत्यता तपासली तर नेमके वास्तव काय हे लक्षात येऊ शकते.

इथे मला एक बाब सर्व वाचकांना स्पष्ट करायची आहे, की मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोणताही पदाधिकारी नाही, किंवा संघाचा प्रवक्ताही नाही. मात्र एक राजकीय विश्लेषक, पत्रकार आणि संघाचा अभ्यासक या नात्याने मी वरील विधानासंदर्भात काही तथ्यावर आधारित मुद्दे मांडू इच्छितो.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ साली विजयादशमीच्या दिवशी झाली. त्यावेळी देशात इंग्रजांचे राज्य होते, आणि त्या काळात देशभरात हिंदू मुसलमानांचे दंगे मोठ्या प्रमाणात होत होते. मात्र त्या काळात हिंदू संघटित नव्हते. त्यामुळे कोणत्याही आपत्तीशी सामना करण्याची त्यांची ताकद नव्हती. ही जबाब हीच बाब डॉ. केशव बळीराम हेडगेवारांच्या लक्षात आली आणि त्यांनी हिंदूंचे संघटन बांधायचे ठरवले. हिंदूंना एकत्र करायचे तर पहिले तरुणांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे ही बाब लक्षात घेत त्यांनी दैनंदिन शाखा सुरू केली. यात तरुण आणि बाल मंडळी दररोज विविध खेळ खेळायची आणि त्याचबरोबर या तरुणांना सैनिकी शिक्षण देखील दिले जात होते. त्याचबरोबर संघटित होऊन स्वतःचा आणि त्याचबरोबर देशाचा विकास घडवण्याच्या दृष्टीने या तरुणांची मने विकसित करण्याचे काम डॉ. हेडगेवार यांनी सुरू केले. सुरुवातीला नागपुरात महाल भागात पहिली शाखा सुरू झाली. हळूहळू शाखांची संख्या वाढू लागली. मग नागपुराबाहेरही शाखा गेल्या. मात्र या शाखांमध्ये फक्त तरुण आणि बालांनाच प्रवेश दिला जात होता. महिला किंवा मुलींना प्रवेश दिला जात नव्हता.

अर्थात डॉ. हेडगेवार यांनी असा निर्णय घेण्यामागे तत्कालीन सामाजिक परिस्थितीही कारणीभूत असावी असे बोलले जाते. आजपासून शंभर वर्षांपूर्वी स्त्री आणि पुरुष एकत्र काम करणे अशक्यप्रय समजले जात होते. शाळांमध्ये सुद्धा मुलामुलींना एकत्र शिकवले जात नव्हते. मुलींसाठी वेगळ्या शाळा सुरू केल्या गेल्या होत्या. मुलींनी सोबतच्या मुलांबरोबर एकत्र खेळणे हा प्रकार तर निषिद्धच मानला जात होता. तसे केल्यास जास्त बदनामी त्या मुलीचीच होत असे. त्यामुळे कोणीही मायबाप असे काही करायला तयार नव्हते. त्यामुळे मुला मुलींची एकत्र संघशाखा सुरू केली असती, तर नव्याच सामाजिक वादाला तोंड फुटले असते, आणि त्यावेळी जे तरुण किंवा बाल संघात येत होते, कदाचित तेही येणे बंद झाले असते.

मात्र ज्याप्रमाणे डॉ. हेडगेवार यांनी तरुण आणि बाल मंडळींसाठी हा उपक्रम सुरू केला तसाच महिलांसाठीही सुरू व्हावा असे अनेकांना वाटत होते. निश्चित मात्र त्यातून मार्ग सापडत नव्हता.

वर्धा येथे संघाची शाखा सुरू झाली आणि त्या शाखेत वर्धेतील केळकर कुटुंबातील मुले जाऊ लागली. संघात जाऊन त्या मुलांचा झालेला विकास बघून या मुलांच्या आई म्हणजेच मावशी केळकर प्रभावित झाल्या. एक दिवस या संघशाखेत डॉ. हेडगेवार पहाणी करायला आले होते. शाखेनंतर त्यांनी शाखेत येणाऱ्या मुलांच्या पालकांशीही संवाद साधला. त्यावेळी मावशी केळकर यांच्या यजमानांचे निधन झाले होते. त्या एकट्यानेच मुलांना वाढवत होत्या. त्यामुळे आपल्या मुलांची पालक म्हणून त्याच डॉ. हेडगेवार यांना भेटायला गेल्या. त्यावेळी त्यांनी डॉक्टर हेडगेवार यांना तुम्ही संघात महिलांना का प्रवेश देत नाही असा प्रश्न विचारला. तेव्हा डॉ. हेडगेवार यांनी आम्ही फक्त तरुणांना संघटित करून त्यांना प्रशिक्षितही करतो आहोत असे सांगितले. मावशी केळकरांचे वाचन अफाट होते. त्या काळात देखील त्यांची रामायणावर प्रवचने होत असत. त्यांनी विविध दाखले देत महिला संघटित आणि प्रशिक्षित झाल्या तर त्या कुटुंबाच्या आणि पर्यायाने समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देऊ शकतात हा मुद्दा हेडगेवार यांना पटवून दिला. त्यावेळी हेडगेवार यांनी मावशींना तुम्हीच महिलांचे संघटन उभे करा, आम्ही गरज पडेल तिथे तुम्हाला सहकार्य करू असे सुचवले.

हेडगेवारांच्या सूचनेवर मावशी केळकर यांचा विचार सुरू झाला. त्यानंतर त्या नागपूरला हेडगेवार यांना भेटायलाही गेल्या. तिथे त्यांची सविस्तर चर्चा झाली. नंतर मावशी केळकरांनी आपल्या सहकारी महिलांशीही चर्चा केली आणि मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्तीवर महिलांसाठी राष्ट्र सेविका समिती ची स्थापना केली जावी असा निर्णय झाला. या निर्णयानुसार च्या विजयादशमीला राष्ट्र सेविका समितीची पहिली शाखा वर्धेत सुरू झाली. समितीचेही काम संघाच्याच धर्तीवर सुरू झाले. संघात ज्याप्रमाणे शिस्तपालन करून तरुणांना सैनिकी शिक्षण तसेच राष्ट्रीय भावना जागवण्याचे आणि हिंदूंना संघटित करण्याचे शिक्षण दिले जात होते, तसेच समितीत महिलांना दिले जाऊ लागले. सुरुवातीला संघाच्याच धर्तीवर काम करण्यासाठी वर्ध्यात संघाचे तत्कालीन ज्येष्ठ अधिकारी अप्पाजी जोशी यांना सांगण्यात आले. त्यानुसार सुरुवातीची दोन वर्षे अप्पाजींनी समितीला मार्गदर्शनही केले.

संघाप्रमाणेच हळूहळू समितीचे कामही वाढू लागले. ज्यावेळी मावशी केळकर यांनी महिलांचे संघटन असावे असा विचार केला होता, त्याचवेळी पुण्यात ताई आपटे तर भंडाऱ्यात नानीबाई कोलते यांचा देखील तसाच विचार होता. या महिलांची जेव्हा डॉ.हेडगेवारांशी भेट झाली, तेव्हा हेडगेवार यांनी त्यांनाही मावशी केळकरांकडे भेटायला सांगितले, आणि हळूहळू व्याप वाढवला जाऊ लागला. मावशी केळकर या समितीच्या संस्थापिका आणि प्रमुख संचालिका बनल्या.

आज देशभरात ज्याप्रमाणे संघाच्या शाखा आहेत, त्याचप्रमाणे राष्ट्र सेविका समितीच्याही शाखा पसरलेल्या आहेत. तिथे महिलांना संघाच्याच धर्तीवर प्रशिक्षित केले जाते. संघ ज्याप्रमाणे समाजोपयोगी कामे करतो, त्याचप्रमाणे समितीचेही काम सुरू आहे. देशाच्या फाळणीच्या वेळी समितीच्या महिला सेविकांनी सीमावर्ती भागात आणि पाकिस्तानात जे योगदान दिले, ते न विसरण्याजोगे आहे. संघ आणि समिती या दोन समांतर चालणाऱ्या संघटना आहेत. दोघांचीही ध्येय सारखीच आहे. मात्र दोन्ही संघटना आपापल्या स्तरावर स्वायत्त आहेत.

डॉ. हेडगेवार नंतर गोळवलकर गुरुजी आणि नंतर बाळासाहेब देवरस हे सरसंघचालक झाले. या दोघांनीही संघ फक्त मैदानावर न ठेवता समाजाच्या सर्वच क्षेत्रात संघाला पोहोचवले. त्यामुळे राजकीय क्षेत्रात भारतीय जनसंघ, आजचा भाजप, कामगार क्षेत्रात भारतीय मजदूर संघ, धार्मिक क्षेत्रात विश्व हिंदू परिषद, वनवासी क्षेत्रात वनवासी कल्याण आश्रम, सहकार क्षेत्रात सहकार भारती, तर उद्योग क्षेत्रात लघुउद्योग भारती, विद्यार्थी क्षेत्रात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर साहित्य क्षेत्रात अखिल भारतीय साहित्य परिषद, आणि सांस्कृतिक क्षेत्रात संस्कार भारती तर आरोग्य क्षेत्रात आरोग्य भारती अशा समाजाच्या सर्वच क्षेत्रात संघ विचारांची मंडळी पोहोचून त्यांनी तिथेही संघ विचार म्हणजेच राष्ट्रीयत्वाचा विचार पोहोचवण्याचे काम केले. आजही ते काम चालूच आहे. आज देशाच्या विविध अशा जवळजवळ ४० क्षेत्रांमध्ये संघाचे काम अशा संघाशी संबंधित संघटनांच्या माध्यमातून पोहोचले आहे. या संघटनांचा मिळूनच आज संघ परिवार झाला आहे. या सर्व संघटना तशा स्वायत्त असल्या तरी या सर्व संघटनांचा परस्परांमध्ये समन्वय राहावा यासाठी संघश्रेष्ठी कायम प्रयत्नशील असतात. त्यामुळेच आज देशातील जवळजवळ ३५ ते ४० कोटी नागरिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या या परिवारातील संघटनांच्या माध्यमातून संघाच्या विचारांशी संबंधित आहेत. संघ परिवारातील या संघटनांमध्ये राष्ट्रसेविका समितीचाही समावेश आहे. आजही संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे समितीच्या अधिकाऱ्यांशी स्नेहपूर्ण संबंध आहेत. नेहमी त्यांच्या भेटीगाठी सुरू असतात आणि प्रसंगी समिती संघाची मदतही घेत असते.

आज देशात १९२५ किंवा १९३० या काळात असलेली परिस्थिती खूप बदललेली आहे.आज स्त्री-पुरुष एकत्रितपणे काम करू लागले आहेत. मात्र जर समांतररित्या संघ ज्या विचारांवर चालतो, त्याच विचारावर चालणारी राष्ट्रसेविका समिती ही महिलासंघटना कार्यरत असेल तर महिलांची दुसरी संघटना उभी करून किंवा महिलांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश देऊन आपल्याच परिवारातील एका संघटनेची स्पर्धा करण्याची गरज काय? या भावनेतूनच संघाचे काम सुरू आहे. त्यामुळे आज संघात महिलांना प्रवेश नसेलही, मात्र महिलांच्याही सर्वांगीण विकासाची आणि त्यांना संघटित करण्याची, तसेच जरूर पडल्यास पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची तयारी होते आहे, हे संघ बघतो आहे. त्यामुळे केवळ स्पर्धेच्या भावनेतून असे काही करावे असे संघश्रेष्ठींना वाटत नसावे असा निष्कर्ष काढता येऊ शकतो. मी दिलेली ही सर्व माहिती संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे चरित्र, तसेच राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका मावशी केळकर, द्वितीय प्रमुख संचालिका ताई आपटे यांचे चरित्र, आणि समितीच्या वरिष्ठ अधिकारी कुसुमताई साठे यांचे चरित्र अभ्यासूनच मी देतो आहे, याची कृपया नोंद घ्यावी. ‌

या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा मनुवादी विचारांचा आहे, तसेच संघ स्त्री पुरुष समानता मानत नाही, हा हर्षवर्धन सपकाळ यांचा आणि इतरही काँग्रेसजनांचा आरोप निरर्थक ठरतो. नागपुरी भाषेत बोलायचे तर याला शुद्ध फोकनाडबाजी असे म्हणता येईल. काँग्रेसजनांनी अभ्यास करून संघातील त्रुटी जरूर शोधाव्या, आणि त्या लोकांसमोर आणाव्या. मात्र अशा निरर्थक थापा मारुन शुद्ध फोकनाडबाजी करू नये, तर त्यांनी ती तत्काळ थांबवावी इतकेच मला इथे सुचवावेसे वाटते.

वाचकहो पटतेय का तुम्हाला हे….?
त्यासाठी आधी समजून तर घ्या राजेहो…..

Views: 82
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
पडळकरवाडीत जमिनीच्या वाटपावरून द्राक्ष बाग तोडली… लाखोचे नुकसान

पडळकरवाडीत जमिनीच्या वाटपावरून द्राक्ष बाग तोडली... लाखोचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)