रांजणगाव येथे दशक्रिया घाट इमारतीचे उद्घाटन संपन्न..
वाघडू ता चाळीसगाव राजणगाव येथे अनिल रामराव चव्हाण यांच्या मातोश्री विमलबाई रामराव चव्हाण यांचे हस्ते कै .रामराव त्रंबकराव चव्हाण यांचे स्मरणार्थ दशक्रिया विधी घाट इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच जिभाऊ पाटील माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य, प्रमोद चव्हाण ज्येष्ठ ग्रामस्थ नामदेव पाटील सुदाम चव्हाण,राजाभाऊ देशमुख सी ए नाशिक , शलिक मोरे सदस्य अनिल पाटील सदस्य,एम डी येवले,सुरेश चव्हाण, नंदुसिंग परदेशी युवराज चव्हाण दिलीप पाटील रवींद चव्हाण संजय सुर्यवंशी, चंद्रकांत सुर्यवंशी ग्रामपंचायत अधिकारी दिलीप नागरे यांचे उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
आपल्या गावांसाठी आपले काही देणे लागते या शब्दाला सार्थ ठरवत….. नाशिक येथे स्थायिक असलेले अनिल रामराव चव्हाण हे गावी असताना आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर दहाव्याच्या वेळी ग्रामस्थांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यावर कायमस्वरूपी पर्याय उपलब्ध व्हावा म्हणून ग्रामपंचायतीकडे या कामा साठी जागा मागितली.
सरपंच प्रमोद चव्हाण व जीभाऊ पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी या कामासाठी ३०० स्क्वेअर फूट जागा ग्रामपंचायतीचे सहकार्याने उपलब्ध करून दिली.
या जागेत साधारण ४ लाख ७१ हजार रुपये खर्च करून कै रामराव त्रंबकराव चव्हाण यांचे स्मरणार्थ दशक्रिया विधी घाट अत्यंत सुसज्य इमारत तयार करण्यात आली.
त्याठिकाणी आज साधारण ३०० स्क्वेअर फूट जागेत सर्व सोयींनी उपयुक्त असा दशक्रिया विधी घाट तयार करण्यात आला आहे.
यामुळे आता सर्व रांजणगाव कर ग्रामस्थांना कायमस्वरूपी दहाव्यासाठी आता कुठेही भटकंती करावी लागणार नाही …………………………
याठिकाणी स्पेशल बाथरूम, दशक्रिया विधी ओटे,बैठक व्यवस्था ओटे,गरम पाण्यासाठी गिझर,आंघोळ करण्यासाठी बादली सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे. यासह आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत .
याकामासाठी चाळीसगांव येथील प्रख्यात इंजिनिअर प्रशांत देशमुख व रोहित पाटील सिव्हिल इंजिनिअर रांजणगावकर या दोघांनीही बांधकाम प्लॅन व सर्व डिझाईन हे निःशुल्क सेवेने करून दिले.
कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी गणेश देवरे , वाल्मीक सोनवणे कचरू गायकवाड कांतीलाल जाधव प्रवीण जाधव यांचे अनमोल सहकार्य लाभले.
या दशक्रिया विधी घाटाचा सर्व रांजणगावकर ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायतीचे वतीने करण्यात आले आहे.