रविवारी मायणीत घुमणार जय श्रीरामचा नारा
श्रीरामनवमी निम्मित धार्मिक भरगच्च कार्यक्रमांची पर्वणी
मायणी दि. ०४:- वार्ताहर
मायणी नगरीत याही वर्षी रविवार दि. ०६ एप्रिल २०२५ रोजी प्रभू श्रीरामांची रामनवमी साजरी होत आहे. मायणीतील सर्व हिंदूप्रेमी संघटना मिळून प्रभू श्रीरामांचा आदर्श लोकांसमोर ठेवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे यादिवशी आयोजन करण्यात आले आहे.
याप्रमाणे असतील श्री रामनवमीचे दिवसभराचे कार्यक्रम. सकाळी १० वा. श्रीरामांची श्रीराम मंदिरात विधिवत पुजा व प्रतिमापुजन होणार आहे. पाळणा, आरती व त्यानंतर सायं. प्रभू श्रीराम रथयात्रा (शोभायात्रा), प्रभू श्रीराम व सिता देखावा, अश्वदळ (घोडे), कांतारा बाहूले, विद्युत रोशनाई, बंगाळ्या शो, रस्त्याच्या दुतर्फा भगवे ध्वज (झेंडे )
साऊंड सिस्टीम, पारंपारिक वाद्ये, ढोलताशा पथक, धनगरी गजीनृत्य असे कार्यक्रम फटाक्यांच्या आतीषबाजीत भव्य आणि दिव्य मिरवणूक असे एकंदर सर्व कार्यक्रमाचे स्वरुप आणि नियोजन आहे. जातीपातींमध्ये अडकलेला हिंदू
समाज एकाच भगव्या ध्वजाखाली आणण्यासाठी देव, देश आणि धर्माबद्दल प्रत्येकाच्या मनात प्रेम निर्माण करण्यासाठी हिंदू धर्मातील रुढी, परंपरा, चालीरिती, सणवार, उत्सव, संस्कार यांच्या माध्यमातून तरुण पिढीच्या
मनात धर्माभिमान जागृत करण्यासाठी अशा प्रकारच्या धार्मिक आदर्शवत सांस्कृतिक कार्यक्रमांची आज समाजाला गरज आहे. प्रभू श्रीरामांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि धर्मवीर छत्रपती शंभूराजांचा आदर्श तरुण पिढीसमोर ठेवण्यासाठी हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. समस्त हिंदू संघटनांच्या रामनवमी, रथयात्रा या कार्यक्रमांना
आपली उपस्थिती दाखवायची आहे. राजकारण विरहीत सर्व जातीधर्माच्या लोकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन ,आयोजक कमिटी कडून करण्यात आले आहे.