• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

घ्या समजून राजेहो….त्यासाठी आधी उद्योगाधिष्ठित आणि उद्योगाभिमुख मराठी समाज घडवायला हवा…..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
April 12, 2025
in Uncategorized
0
घ्या समजून राजेहो….त्यासाठी आधी उद्योगाधिष्ठित आणि उद्योगाभिमुख मराठी समाज घडवायला हवा…..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

घ्या समजून राजेहो….

त्यासाठी आधी उद्योगाधिष्ठित आणि उद्योगाभिमुख मराठी समाज घडवायला हवा

ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

नुकतीच फेसबुकवर भालचंद्र श्री पंडित यांची एक पोस्ट वाचण्यात आली. दि ८ एप्रिल २०२५ च्या इकॉनोमिक टाइम्स या दैनिकात फिकी या संघटनेची एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. फिकी हे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स चा शॉर्ट फॉर्म म्हणजेच लघुरूप आहे. देशभरात विविध महानगरांमध्ये आणि प्रांतांमध्ये उद्योजक आणि व्यावसायिकांचे चेंबर्स ऑफ कॉमर्स म्हणजेच संघटना आहेत त्यांची फिकी ही शीर्ष संघटना आहे. या संघटनेच्या १९२७ पासून तर आज २०२५ पर्यंत झालेल्या अध्यक्षांची यादी या जाहिरातीत प्रकाशित करण्यात आली आहे. ही यादी चाळली असता त्यात फक्त एक मराठी नाव असल्याचा उल्लेख पंडित यांनी केलेला आहे. ते नाव सुप्रसिद्ध मराठी उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांचे आहे. शंतनुराव १९६५ साली फिकीचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. त्यानंतर गेल्या ६० वर्षात किंवा त्यापूर्वीच्याही ३८ वर्षात एकही मराठी उद्योजक किंवा व्यावसायिक या संघटनेचा अध्यक्ष झालेला नाही.

महाराष्ट्र हे उद्योगधंद्यात आघाडीवर असलेले देशातील प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते. इथे रोजगारासाठी देशभरातून बेकारांचे लोंढे येत असतात. महाराष्ट्र हे मराठी माणसांचे राज्य म्हणून ओळखले जाते. मात्र इथे केल्या ९८वर्षात फिकी या राष्ट्रीय संघटनेचा अध्यक्ष बनण्यासाठी फक्त एक मराठी माणूस पुढे यावा हे मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

महाराष्ट्र हे उद्योगधंद्यात प्रगत राष्ट्र राज्य म्हणून ओळखले जाते हे आधी नमूद केले आहेच. मात्र इथे बाहेरच्या व्यक्तींनी येऊन उद्योग उभे केले. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी, नसली वाडिया, लालचंद हिराचंद, अशी अनेक उदाहरणे देता येतील. हे सर्व उद्योजक आपापल्या राज्यातून महाराष्ट्रात आले. त्यांनी इथे कष्ट करून उद्योग उभारले. इथल्या नागरिकांना रोजगार दिला. आम्ही इथे रोजगार मिळतो म्हणून खुश राहिलो. मात्र आम्ही महाराष्ट्रियन फक्त नोकऱ्या मागणारेच राहिलो. नोकऱ्या देणारे कधी बनण्याचा विचारच केला नाही. त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

मराठी माणसाचा स्वाभिमान जागा करण्यासाठी महाराष्ट्रात शिवसेना उभी झाली. मात्र या शिवसेनेने मराठी माणसाला नोकऱ्या कशा मिळतील हाच प्रयत्न केला. नाही म्हणायला बेरोजगार मराठी तरुणांना त्यांनी वडापावच्या हातगाड्या लावायला मदत केली. त्यापुढे मराठी माणसाने उद्योग उभे करावेत यासाठी शिवसेनेनेही फारसे प्रयत्न केल्याचे लक्षात आलेले नाही. ज्यांनी ज्या मराठी माणसांनी स्वकष्टाने उद्योग उभे केले, तिथे कामगार संघटना उभ्या करून ते उद्योग बंद कसे पडता येतील, आणि त्या मालकांना खंडणी मागून बेजार कसे करता येईल हे प्रयत्न मात्र निश्चित झाल्याचे बोलले जाते. मराठी माणसाने छोटे छोटे का होईना पण अधिक गृह उद्योग सुरू करावे आणि मग त्याला मोठे स्वरूप द्यावे यासाठी शिवसेनेकडून कधीच प्रयत्न झाले नाहीत.

मराठी माणूस हा नाकासमोर पाहून सरळ चालणारा माणूस म्हणून ओळखला जातो. त्यामुळे दहा ते पाच खरडेघाशी करायची आणि संध्याकाळी घरात निवांत तंगड्या ताणून लोळायचे यातच मराठी माणूस धन्यता मानतो. आपण नोकरी सांभाळूनही फावल्या वेळात काही उद्योग करू शकतो हा विचार मराठी माणसाच्या मनात फारसा कधी आलेला दिसत नाही. त्यामुळेच परप्रांतीय इथे येतात. ते एकाच झोपडीत दहा दहा जण दाटीवाटीने राहतात. दिवसभर हातगाडीवर भाजीपाला किंवा मग भेळ पाणीपुरी विकतात आणि मग काही वर्षात मालामाल होऊन स्वतःचा उद्योग उभे करतात. मराठी माणूस हा कायम चाकरमान्याच राहतो.

त्यातही एखाद्या मराठी माणसाने आपण काही उद्योगधंदा करावा असा विचार केलाच तर त्याला त्याच्या अवतीभवतीचे नातलग किंवा इष्टमित्र हे कधीच प्रोत्साहन देताना दिसत नाहीत, तर त्याचे पाय कसे ओढता येतील याचाच विचार करतात. इतर समाजामध्ये कोणी एक माणूस व्यवसायासाठी पुढे आला, तर संपूर्ण समाज त्याच्या पाठीशी उभा राहतो. मात्र मराठी माणूस कधीच दुसऱ्या मराठी माणसाला सहकार्य करायला पुढे येताना दिसत नाही. ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे म्हणायचे की मराठी माणूस हा खेकड्यासारखा असतो. एका टोपलीत जर दहा खेकडे टाकले आणि त्यातील एकाने वर जायचा प्रयत्न केला तर दुसरा त्याच्या तंगडीत तंगडी अडकवून त्याला खाली खेचतो. मग दुसरा वर जातो तेव्हा तिसरा त्याला खाली खेचतो. असेच सुरू राहते आणि मराठी माणूस जागच्या जागीच राहतो.

गेल्या १००-१२५ वर्षाचा इतिहास तपासला तर किर्लोस्कर, गरवारे, दांडेकर असे काही मोजकेच मराठी उद्योजक पुढे आलेले दिसतात. इतर अनेक उद्योजकांनी प्रयत्न जरूर केले. मात्र त्यांना आलेल्या अडचणी लक्षात येता त्यांचा शेवटपर्यंत टिकाव लागला नाही. काहींना तर मराठी राजकारण्यांनीच अडथळे निर्माण केले. एका गाजलेल्या बांधकाम व्यावसायिकाने महाराष्ट्रातीलच एका प्रमुख राजकारण्याला काही कारणावरून नाराज केले, म्हणून त्या व्यावसायिकाला गेली काही वर्षे सहकुटुंब तुरुंगात मुक्काम करावा लागलेला आहे. या मराठी उद्योजकाला तुरुंगात अडकवणारा मराठी राजकारणीच आहे आणि केवळ खुनशीपणाने सुडाच्या भावनेतूनच त्याने हे कृत्य केले आहे हे विशेष.

असे असले तरी आम्ही मराठीजन खोटा अभिमान बाळगून राडे करण्यात आघाडीवर आहोत. महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती ही परप्रांतीय उद्योजकांमुळेच झाली हे वास्तव नाकारता येत नाही. मात्र हाच मुद्दा माजी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी एका भाषणात मांडला तेव्हा शिवसैनिक त्यांच्या राजीनामेसाठी मैदानात उतरले होते. अर्थात त्यांच्या नेत्यांनीच तसा आदेश दिला असल्यामुळे त्यांना मैदानात उतरावेच लागले होते. मात्र मराठी उद्योगधंद्याला शिवसेनेने तरी किती साथ दिला याचा इतिहास तपासला तर निराशाच पदरी येते. मला आठवते ख्यातनाम हृदयरोगतज्ञ डॉ. नीतू मांडके यांनी मुंबईत हृदयरोग्यांसाठी एक अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट उभारण्याचा संकल्प सोडला होता. माझ्या आठवणीनुसार २००१ मध्ये डॉ. मांडके नागपुरात आले असताना त्यांनी पत्रकार संघाच्या मीट द प्रेस या कार्यक्रमात बोलताना आपल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती दिली होती. डॉ. मांडके यांनी अनेक रुग्णांवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया केल्या होत्या. त्यात शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचाही समावेश होता. दुर्दैवाने हा प्रकल्प उभा होण्यापूर्वीच डॉ. मांडके यांचे अकस्मात निधन झाले. त्यांचा हा प्रकल्प अपूर्णच होता. शेवटी अंबानी परिवार पुढे आला आणि त्यांनी हा प्रकल्प पूर्ण करून तिथे कोकिलाबेन अंबानींच्या नावे अत्याधुनिक हॉस्पिटल उभारले. त्यावेळी शिवसेना पुढे येईल आणि समाजातून पैसा उभा करून एका मराठी तज्ञ डॉक्टरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेईल अशी माझ्यासह अनेकांना अपेक्षा होती. मात्र तिथे शिवसेनेने शांत राहणेच योग्य समजले असावे. आज ते हॉस्पिटल अंबानींचे म्हणून पुढे चालते आहे आणि एका मराठी माणसाचे स्वप्न साकार होताच अपूर्ण राहिलेले आहे. हे आमचे मराठी माणसाबद्दलचे प्रेम आहे.

मराठी माणूस उद्योगधंद्यात पुढे यावा, त्याने नोकरी करणारा न होता नोकरी देणारा व्हावे, यासाठी मराठी माणसाची मानसिकता बदलणे आज गरजेचे झाले आहे. आजच्या स्थितीत आपल्याला उद्योगाधिष्ठित आणि उद्योगाभिमुख मराठी समाज घडवणे गरजेचे आहे. प्रत्येक मराठी तरुणाने इतकेच नव्हे तर तरुणीने सुद्धा आमचा स्वतःचा व्यवसाय उद्योग धंदा कसा उभा होईल हाच विचार करायला हवा. त्यासाठी त्याला फक्त स्वतःने विचार करून चालणार नाही तर त्याच्या परिवाराने सुद्धा त्याला साथ द्यायला हवी. तरच मराठी माणूस उद्योगधंद्यात पुढे येऊ शकेल. मला आठवते मध्य भारतातील प्रख्यात बांधकाम व्यवसायिक प्रभाकरराव मुंडले यांनी जेव्हा व्यवसाय सुरू केला तेव्हा त्यांचे तीन भाऊ सरकारी नोकरीत होते. या भावांनी दरवेळी मिळणारा फेस्टिवल ॲडव्हान्स घ्यायचा आणि तो पैसा प्रभाकरराव मुंडलेंच्या व्यवसायासाठी द्यायचा असे करून त्यांना खेळते भांडवल उपलब्ध करून देत होते. कुटुंबातून अशा प्रकारचे सहकार्य निश्चितच मिळू शकते.

आज मराठी विवाहेच्छु तरुणींचे आई-वडील जेव्हा मुलीसाठी स्थळे बघतात, तेव्हा ते शक्यतोवर व्यावसायिक नको असाच विचार करतात. त्यातही तो व्यावसायिक असला तर दुसऱ्या पिढीचा व्यावसायिक असावा, म्हणजेच त्याचा वडिलोपार्जित धंदा असावा आणि हे चिरंजीव आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारे असावे, अशीच वधूपित्याची आणि त्याच्या परिवाराची अपेक्षा असते. मुलींचीही अपेक्षा अशीच असते. आज मुली देखील मुलांच्या बरोबरीने शिकलेल्या आहेत. त्याही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नोकरी करत आहेत. काही वर्षांपूर्वी मी अशाच काही वधु परिवारांना असे सुचवले की जर मराठी माणूस उद्योगधंद्यात पुढे यायला हवा असेल, तर एका पिढीने त्याग करायलाच हवा. घर संसार चालवायला पैसा लागतोच. जर पती उद्योग करत असेल आणि त्याच्या उद्योगात त्याचा पुरेसा जम बसलेला नसेल, तर पत्नीने नोकरी करून कुटुंबाला हातभार लावायला काय हरकत आहे? असा हातभार लावला तर तो उद्योजक घरची चिंता न करता निर्धास्त मनाने आपल्या उद्योगाकडे लक्ष देऊ शकेल, आणि हळूहळू उद्योगात जम बसवू शकेल. त्यासाठी एका पिढीला हा त्याग करावाच लागणार आहे. मात्र आमच्या मराठी मनाला हा विचार लवकर पचत नाही आणि रुचत तर बिलकुलच नाही.

म्हणूनच आज उद्योगाभिमुख आणि उद्योगाधिष्ठित समाज घडवणे ही खरी गरज आहे. तसे झाले तर मराठी माणूस उद्योगधंद्यात पुढे येईल, आणि नोकऱ्या मागणारा न बनता नोकऱ्या देणारा स्वाभिमानी माणूस बनेल. त्यावेळी मराठी माणसाचा डंका फक्त भारतातच नव्हे तर जगभरात पोहोचलेला असेल, आणि फक्त फिकी या राष्ट्रीय संघटनेचेच नव्हे, तर जागतिक संघटनेचेही अध्यक्षपद वारंवार मराठी माणसाकडे आलेले दिसू शकेल. मग त्यावेळी कोणत्याही कोशियारींना महाराष्ट्रावर टीका करण्याची वेळ येणार नाही हे नक्की.

वाचकहो पटतेय का तुम्हाला हे…..? त्यासाठी आधी समजून तर घ्या राजेहो…..

Views: 121
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ” डीजे लावून नाचून साजरी करण्या पेक्षा पुस्तके वाचून साजरी करूया ; अॅड रविंद्र अहिरे यांचे आवाहन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती " डीजे लावून नाचून साजरी करण्या पेक्षा पुस्तके वाचून साजरी करूया ; अॅड रविंद्र अहिरे यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)