कोंढावळ येथे शिवणकाम प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन
-महात्मा फुले जयंतीनिमित्त युवकमित्र परीवार संस्थेचा उपक्रम
- महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार प्राप्त व्हावा,आत्मनिर्भर होता यावे करीता युवकमित्र परीवार कोठली या संस्थेमार्फत मोफत शिवणकला प्रशिक्षण कोर्स राबविण्यात येत आहे.या उपक्रम अंतर्गत कोंढावळ ता.शहादा येथे माजी उपसरपंच कल्पनाबाई लालचंद माळी यांच्याहस्ते शिवणकाम प्रशिक्षण वर्गाचे ऊदघाटन करण्यात आले.प्रसंगी युवकमित्र संस्थेचे संस्थापक प्रवीण महाजन,युवा कार्यकर्ते निखिल माळी, प्रशिक्षका वैशाली माळी यांच्यासह प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.
क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमांत प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी युवकमित्र परिवार कोठली यांच्या शिवणकाम उपक्रमाची माहिती देण्यात आली.किमान ४० दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण सत्रात गरीब व गरजू महिलांना विविध प्रकारचे टेलरिंग प्रशिक्षण देण्यात येणार असून परिसरातील हजारो महिलांना प्रशिक्षण देण्याचा उद्देश असल्याचे यावेळी प्रवीण महाजन यांनी सांगितले.गावातील महिलांना शिवणकला प्रशिक्षण कोर्स उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी उपसरपंच कल्पनाबाई माळी यांनी समाधान व्यक्त केले तर जास्तीत जास्त महिलांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन निखिल माळी यांनी केले.प्रशिक्षक वैशाली माळी यांनी आभार मानले.


