सायबर कॉन्क्लेव 1.0 ही केवळ एक परिषद नव्हती, तर “सायबर सेफ इंडिया” या ध्येयाकडे वाटचाल करणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल होते – अॅड. चैतन्य भंडारी
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
धुळे :- येथे पार पडलेली सायबर कॉन्क्लेव 1.0 – मिशन सायबर सेफ खान्देश ही राष्ट्रीय पातळीवरील परिषद मोठ्या उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडली. ही परिषद सायबर कायदा आणि सायबर गुन्हे याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सायबर अवेअरनेस फाऊंडेशन आणि सायबर क्लोक डिजिटल लिगल सर्व्हिसेस चे संस्थापक अॅड. चैतन्य भंडारी यानी आयोजित केली होती. या परिषदेचे प्रमुख पाहूणे म्हणून मा. न्यायमूर्ती सारंग कोतवाल साहेब,मा. श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक, धुळे मा. किशोर काळे अप्पर पोलीस अधीक्षक,अॅड. डी. वाय. तवर उपस्थित होते.
या परिषदेतील प्रमुख वक्ते म्हणून अॅड. डॉ. प्रशांत माळी सायबर तज्ञ मुंबई आणि डॉ. रक्षित टंडन अंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा तज्ञ यांनी सायबर जागरूकता संदर्भात महत्वाचे विचार मांडले.आणि त्यांनी सायबर गुन्ह्यांपासून बचाव कसा करायचा हे देखील सांगितले आहे आणि म्हणाले की, चैतन्य भंडारी यांनी सायबर क्षेत्रात चांगले काम केले आहे. पॅनेल चर्चेमध्ये पोलीस, सरकारी वकील, सायबर एक्सपर्ट व युवा वकिलांनी सहभाग घेतला.
ॲड.चैतन्य भंडारी यांनी डिजिटल हिरो अवॉर्ड देऊन सायबर क्षेत्रातील विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. ही परिषद अॅड. चैतन्य मोहन भंडारी व त्यांच्या समर्पित टीम अॅड. प्रशांत वाघ, अॅड प्राजक्ता राणा, साक्षी पारशकर,अॅड समीर शाह,कामिनी देसले,भक्ती शहा,पुष्पेश श्रीखंडे आणि हसमीत ग्यानी यांच्या अथक परिश्रमातून यशस्वी झाली.